शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: January 12, 2017 01:23 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान

  गणेश धुरी :  नाशिक जिल्हा परिषदेच्या दहाव्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल वाजला असून, स्थापनेपासून सलग पंचवीस वर्षे सत्तेत राहणाऱ्या कॉँग्रेस आणि आताची वीस वर्षे सत्तेत राहणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान राहणार आहे. कॉँग्रेसने स्थापनेच्या १९६२ पासून सलग २५ वर्षे, तर १९९२ नंतर शिवसेना व माकपचा प्रत्येकी एक अपवाद वगळता राष्ट्रवादी कॉँग्रेसने २० वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता राखली आहे. जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली. जिल्हा परिषदेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत कॉँग्रेसकडून भानुदास कवडे यांना अध्यक्षपद भूषविण्याची संधी लाभली. त्यानंतर सातत्याने १९६२ ते १९६७, १९६७ ते १९७२, १९७२ ते १९७७ तसेच १९७७ ते १९७९ या काळात कॉँग्रेसनेच सत्ता राखली. मधल्या काळात केवळ नाशिकच्याच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांवर सलग ११-१२ वर्षे प्रशासकीय कारकीर्द राहिली. त्यानंतर १९९२ साली कॉँग्रेसकडूनच गोपाळराव गुळवे यांनी सलग पाच वर्षे अध्यक्षपद राखले. त्यानंतरच्या काळात पांडुरंग राऊत यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा मिनी मंत्रालयावर फडकला. त्यानंतर पंढरीनाथ थोरे, अनिलकुमार अहेर, विद्या पाटील, के. के. पवार, पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, जयश्री पवार व आताच्या विजयश्री चुंभळे यांच्या रूपाने अध्यक्षपद भूषविण्याची संधी राष्ट्रवादीला लाभली. त्यातील अनिलकुमार अहेर व के. के. पवार यांचा अपवाद होता. अनिलकुमार अहेर कॉँग्रेसकडून तर के. के. पवार यांनी माकपकडून अध्यक्षपद भूषविले. आता ७३ गटांसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यातील ३७ गट महिलांसाठी तर ३६ गट पुरुष राखीव आहेत. अर्थात पुरुष राखीव गटातून महिलांनाही उभी राहण्याची संधी आहे. त्यातील सर्वाधिक २९ गट अनुसूचित जमाती संवर्गासाठी तर २० गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तसेच १९ गट सर्वसाधारण संवर्गासाठी तर पाच गट अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहेत. नगरपालिका निवडणुकांचा कल पाहता राष्ट्रवादी व कॉँग्रेससमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. नाशिक जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी राहणार आहे.