शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

'काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाचा मुद्दा उपस्थित करावा', रावसाहेब दानवेंचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 6:47 PM

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते.

नाशिक - काँग्रेस राष्ट्रवादी हे आम्हाला जातीवादी म्हणतात, ते इतर मुद्द्यांवरुन आम्हाला लक्ष्य करतात. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीनं विकासाच्या मुद्द्यावरुन आम्हाला लक्ष्य करावं, असं आव्हान देत असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. नाशिक येथील शिवसेना-भाजपा युतीच्या मेळाव्यात बोलताना, दानवेंनी मोदी अन् फडणवीस सरकारच्या विकासाचा पाढाच वाचला. नाशिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा चोपडा सभागृहात सुरू झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. ग्राम विकास राज्य मंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक केले

पुढे बोलताना दानवे म्हणाले की, आम्हाला मायावती जातीयवादी म्हणतात, पण आमचे लालजी टंडन हे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी मायावतींच्या सरकारसोबत आम्हीच सत्तेत होतो. मग, तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का. ममता बॅनर्जी याही आमच्याच मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते. मग, तुम्हीच सांगा आम्ही जातीवादी कसे ? तुमच्याशी न जमल्यास आम्ही जातीवादी का? असा प्रश्न उपस्थित करत रदानवेंनी उपस्थित केला आहे. आमचे नेते, आमचे पंतप्रधान, आमचे राष्ट्राध्यक्ष नेहमीच सांगतात, आम्ही घटना बदलणार नाही, तरीही आघाडीचे नेते चुकीचा प्रचार करुन भाजपा सरकार घटना बदलणार असल्याचे सांगतात. विकासाच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी, आघाडीचे नेते मतांच राजकारण करत असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. 

अटलजींचं तीनवेळेचं सरकार आणि मोदींच्या आताच्या सरकाराने दाखवून दिलंय, की काँग्रेसपेक्षा आम्ही चांगल काम करतोय. मात्र, या आघाडीकडून इतर मुद्द्यांवरुनच युतीला लक्ष्य केलं जातंय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला विकासाचा मुद्दा उपस्थित करण्याचा आव्हान देत असल्याचे दानवेंनी म्हटले. तसेच, पुन्हा एकदा नव्यानं एकत्र येऊन युतीचे 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. गेल्या 5 वर्षात युती सरकारने केंद्रात आणि राज्यात मोठी विकासकामे केली आहेत. शेती, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात महत्त्वाची कामे केली आहेत. मुंबईला कोस्टल रोड केला, मुंबईची मेट्रो केली, नागपूरची मेट्रो केली, पुण्याची मेट्रो केली. जळगावचं एअरपोर्ट केलं, नवी मुंबईचं नवीन एअरपोर्ट आपण करत आहोत, अशी मोठी विकासकामे आपण केली आहेत. शेतकरी कर्जमाफीही केल्याचं दानवेंनी सांगितलं. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस