सटाण्यात कंडक्टरचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:37 IST2019-07-17T01:36:38+5:302019-07-17T01:37:58+5:30
ड्यूटीवर हजर होण्यासाठी घरून निघालेले सटाणा बस आगारातील वाहक पंकज चौधरी यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ठेंगोडा गावाजवळील आॅइल मिलजवळ घडली आहे.

सटाण्यात कंडक्टरचा अपघातात मृत्यू
सटाणा : ड्यूटीवर हजर होण्यासाठी घरून निघालेले सटाणा बस आगारातील वाहक पंकज चौधरी यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ठेंगोडा गावाजवळील
आॅइल मिलजवळ घडली आहे.
सटाणा आगारात नव्यानेच रुजू झालेले कंडक्टर पंकज चौधरी यांना सटाणा आगारातून सकाळी सहा वाजता निघणाऱ्या सटाणा-पुणे बसवर ड्यूटी होती. सोमवारी त्यांना साप्ताहिक सुट्टी असल्याने चौधरी हे आपल्या मूळ गावी पिंप्री अंचला येथे गेले होते. सकाळी सहा वाजता ड्यूटी असल्यामुळे पंकज हे भल्या पहाटेच दुचाकीने सटाण्याकडे निघाले होते. ठेंगोड्याजवळील आॅइल मिलजवळ ते आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पंकज चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.