शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावातील घसरणीमुळे चिंता

By admin | Updated: September 22, 2016 22:59 IST

कांद्याच्या भावातील घसरणीमुळे चिंता

 वणी : कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, परतीच्या पावसामुळे कांदा साठवण करणे शक्य नसल्याने उत्पादक काळजीत पडले आहेत. वणीच्या उपबाजारात आज तीनशे वाहनांमधून उत्पादकांनी कांदे विक्रीसाठी आणले होते.कळवण, चांदवड, देवळा व दिंडोरी भागातील शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्यास अपेक्षित दर मिळाले नाहीत. सरासरी २५० रुपये क्विंटल दराने व्यवहार पार पडले. मागे व्यापारीवर्गाच्या संपामुळे कांदा चाळीत ठेवावा लागला होता. तेव्हा काही ठिकाणी पावसामुळे कांदा विक्री स्थितीत राहिला नव्हता, अशा स्थितीत काही उत्पादकांनी पोटच्या मुलाप्रमाणे कांद्याची निगा ठेवली होती. दरम्यान, त्याही कांद्याला समाधानकारक दर मिळाला नव्हता व दरातील घसरण सुरूच राहिली. दरम्यान, कांदा खरेदीदार देशांतर्गत मागणी वाढली तरच कांदा खरेदीस अनुकूलता दर्शवितात. कारण सद्य-स्थितीत शेतकरीवर्गाला कांदा चाळीत ठेवणे धोक्याचे आहे. तीच स्थिती व्यापारीवर्गाची आहे. कारण गुदामात कांदे साठविले व पावसाचा जोर वाढला तर कांदे फेकावे लागतील व तो खर्च सोसण्याची तयारी व्यापारीवर्गाला ठेवावी लागेल. ते आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याची व्यापाऱ्यांची भावना आहे. (वार्ताहर)