शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

तक्र ारदाराच्या आईला सरपंचाकडून मारहाण

By admin | Updated: January 31, 2016 23:56 IST

गुन्हा दाखल : अतिक्रमण केल्याची तक्रार केल्याचे कारण

कळवण : तालुक्यातील मळगाव येथील शासकीय जमिनीवर अतिक्र मण केल्याची तक्रार केली म्हणून मळगावच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह दहा जणांनी तक्रारदाराच्या आईला, भावाला व वडिलांना घराबाहेर बोलवून मारहाण केल्याची फिर्याद तक्रारदाराच्या आई जिजाबाई राऊत यांनी कळवण पोलिसांत दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.जगदीश राऊत यांच्या तक्रारी अर्जाची मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन तहसीलदार, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह १२ जणांना नोटीस बजावली असून, ४ फेब्रुवारी २०१६ रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याने मळगावच्या अतिक्रमण-धारकांचे धाबे दणाणले आहे.मळगाव येथील तलाठी चौरे यांनी याबाबत सरपंच मीनाबाई गवळी, उपसरपंच विश्वास ठाकरे, पंडित देशमुख, जिभाऊ देशमुख, सोमनाथ देशमुख, जिभाऊ ठाकरे, जगन गवळी, तुकाराम देशमुख, मीराबाई देशमुख, सोनाबाई देशमुख, ग्रामसेवक यांना अतिक्रमण केले म्हणून अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याबाबत नोटिसीद्वारे सूचित केल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणाबाबत तक्र ार केली म्हणून संतप्त झालेल्या अतिक्र मणधारकांनी तक्र ारदार जगदीश राऊत यांच्या घरी जाऊन घरासमोर शिवीगाळ केली, सरपंच मीनाबाई गवळी व उपसरपंच विश्वास ठाकरे यांनी तक्रारदाराची आई जिजाबाई राऊत यांना घराबाहेर बोलवून शिविगाळ करून मारहाण केली. गळ्यातील सोन्याची मनचली तोडून दहा हजार रुपयांचे नुकसान केले, सोडवणूक करण्यासाठी आलेले पती, मुलगा व नातेवाइकांना विश्वास जिभाऊ ठाकरे व जिभाऊ गंगाराम देशमुख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अतिक्रमण काढण्याबाबत पुन्हा तक्रारी अर्ज केला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असा दम दिला, अशी फिर्याद जिजाबाई राऊत यांनी कळवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. याबाबत कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)