शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या सत्तेला दलबदलूंचा आधार

By admin | Updated: February 25, 2017 00:51 IST

१६ नगरसेवक विजयी : सेनेपेक्षा भाजपाला सर्वाधिक लाभ

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुमारे ४५ हून अधिक नगरसेवकांनी पक्षांतर करत कुणी सेना-भाजपाची, तर कुणी कॉँग्रेस-राष्ट्रवादी-मनसेची वाट चोखाळली. परंतु, या दलबदलूंचा सर्वाधिक लाभ भाजपाला झाला आहे. भाजपाकडून दहा दलबदलू नगरसेवक निवडून आले, तर शिवसेनेकडून पाच जणांची लॉटरी लागू शकली आहे.  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा-आठ महिन्यांपासून पक्षांतराचा खेळ सुरू होता. मनसेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे लचके तोडण्यासाठी सेना-भाजपात जणू काही स्पर्धा लागली होती. दर पंधरवड्याला कुणी मातोश्रीवर गंडाबंधन करून घेत होते, तर कुणी वसंतस्मृतीसह मंत्रालयाची पायरी चढत भगवा ध्वज हाती घेत होते. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मनसेला बसला होता. मनसेच्या ४० पैकी तब्बल ३० नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यात शिवसेनेकडे मनसेच्या सर्वाधिक नगरसेवकांनी प्रवेश केला. त्याखालोखाल भाजपाला पसंती दिली. महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ झाली. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्याही काही नगरसेवकांनी पक्षांतर केले.  पक्षांतर केलेल्या सर्वच नगरसेवकांना उमेदवारी मिळाली नाही. एकूण ७९ पैकी पुन्हा निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या ३८ राहिली, तर ४१ नगरसेवक पराभूत झाले. त्यात विजयी ३८ नगरसेवकांमध्ये १४ नगरसेवक हे दलबदलू होते, तर पराभूत झालेल्या ४१ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवक हे दलबदलू होते. नाशिककरांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय सोय पाहत पक्षांतर केलेल्यांना नाकारल्याचे दिसून येते. जे काही दलबदलू निवडून आले त्यातही काही स्वत:च्या वैयक्तिक कामगिरीवर विजयी झाले, तर काही दलबदलूंना नवसंजीवनी लाभली. भाजपाकडून दहा, तर सेनेकडून पाच आणि एक अपक्ष दलबदलूंना पुन्हा महापालिकेत जाण्याची संधी लाभली. विजयी झालेले दलबदलूउद्धव निमसे (भाजपा), विमल पाटील (अपक्ष), शशिकांत जाधव (भाजपा), शिवाजी गांगुर्डे (भाजपा), समीना मेमन (राष्ट्रवादी), अर्चना थोरात (भाजपा), रंजना बोराडे (शिवसेना), संगीता गायकवाड (भाजपा), कोमल मेहरोलिया (भाजपा), रमेश धोंगडे (शिवसेना), कल्पना चुंभळे (शिवसेना), सुवर्णा मटाले (शिवसेना), रत्नमाला राणे (शिवसेना), दीपाली कुलकर्णी (भाजपा), सतीश कुलकर्णी (भाजपा) व रुची कुंभारकर (भाजपा).पराभूत झालेले दलबदलूपरशराम वाघेरे (शिवसेना), दामोदर मानकर (भाजपा), योगीता अहेर (शिवसेना), माधुरी जाधव (भाजपा), यतिन वाघ (शिवसेना), गुलजार कोकणी (कॉँग्रेस), नंदिनी जाधव (शिवसेना), पवन पवार (अपक्ष), मंदा ढिकले (अपक्ष), अशोक सातभाई (शिवसेना), हरिष भडांगे (अपक्ष), कन्हैया साळवे (भाजपा), रेखा बेंडकुळे (भाजपा), शीतल भामरे (शिवसेना), सुदाम कोंबडे (भाजपा), रशिदा शेख (अपक्ष), संजय चव्हाण (अपक्ष) व ज्योती गांगुर्डे (मनसे).