शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस-पालिका आयुक्तांमध्ये खडाजंगी

By admin | Updated: March 16, 2015 00:44 IST

पालकमंत्र्यांसमोर प्रकार : अतिक्रमण काढण्यास पोलीस बळ मिळत नसल्याची तक्रार

नाशिक : गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी रात्री पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घाईघाईने शासकीय विश्रामगृहावर बोलाविलेल्या बैठकीत आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण प्रश्नावर चर्चा येऊन ठेपली तेव्हा पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे आल्यानंतर पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पालकमंत्र्यांच्या समक्ष हा प्रकार घडल्यानंतरही पोलीस आयुक्तांनी आपला नन्नाचा पाढा चालूच ठेवल्याने अन्य उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधीही अवाक् झाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सुरू केली. त्यानुसार गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगर परिसर, पाथर्डी फाटा, पेठरोड पंचवटी आदि भागात मोहीम राबविण्यात आल्याने अनेकांनी कारवाईच्या भीतीने स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली. त्यानंतर महापालिकेने शहरातील सुमारे साडेतीन हजार अनधिकृत बांधकामांवर रेड मार्किंग करून ठेवले आहे. पालिका आयुक्तांच्या या मोहिमेचे स्वागत झाले, तसेच धनदांडग्यांची अतिक्रमणे न हटविल्याबद्दल टीकाही झाली. याशिवाय आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका येथील वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा उचलून धरल्याने पालिकेवर शहरातील अतिक्रमण हटविण्यासंबंधी दबाव वाढतो आहे. त्यानुसार महापालिकेकडून पोलीस आयुक्तांकडे अतिक्रमण हटविण्यासंबंधी वारंवार पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते; परंतु कधी व्हीआयपींचे दौरे तर कधी सण-उत्सवामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करत बंदोबस्त देण्यास टाळाटाळ केली जाते. शनिवारी रात्री पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल आणि पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम दोन्हीही हजर होते. यावेळी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ते मोकळे करण्याचा प्रश्न चर्चेला आला त्यावेळी पालिका आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अतिक्रमण मोहीमही थांबली असल्याचे सांगण्यात आले. पालिका आयुक्तांच्या खुलाशानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना जाब विचारला तेव्हा पोलीस आयुक्तांनी बंदोबस्त देता येणार नसल्याचे सांगितले. मोहिमेसाठी पालिकेकडे सध्या १५ पोलीस कर्मचारी असून, आणखी ५० पोलीस कर्मचारी मिळाले, तरी मोहीम सुरू ठेवता येईल, असा युक्तिवाद पालिका आयुक्तांनी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना बंदोबस्त देण्याची सूचना केली. तरीही पोलीस आयुक्तांचा ताठा कायम राहिला. शहरात साडेतीन हजार पोलीस कर्मचारी असताना पन्नास कर्मचारी देण्यास काय हरकत आहे, अन्यथा ग्रामीण विभागाकडून पोलीस कर्मचारी मागवून घ्या, असा सल्ला पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिला तरीही पोलीस आयुक्तांनी वेगवेगळी कारणे पुढे करत नन्नाचा पाढा कायम ठेवला. यामुळे वातावरण काहीसे तापले.सध्या सिंहस्थामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण चालू असल्याने कर्मचारी उपलब्ध करून देता येत नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले; परंतु त्या उत्तराने ना पालिका आयुक्तांचे समाधान झाले ना पालकमंत्र्यांचे. अखेर पालकमंत्र्यांनी एप्रिलमध्ये पोलीस बंदोबस्त देण्याची सूचना करत चर्चेची गाडी दुसऱ्या विषयांकडे वळविली आणि हा विषय थांबला. (प्रतिनिधी)