शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

करवाढीच्या निर्णयावर आयुक्त ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:54 AM

महापालिकेने १ एप्रिल २०१८ पासून नव्याने उभारण्यात येणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चित करत त्यात पाच ते सहा पटीने वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत असताना आयुक्त तुकाराम मुंढे मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यापूर्वी शहरात मोकळ्या जमिनींवरील कर वसूल केला जात नव्हता, तो आपण सुरू केल्याचे सांगत आयुक्तांनी कोणत्याही प्रकारच्या मोकळ्या जमिनीवर करआकारणी होणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे शेतजमिनीवरही करआकारणीचे संकेत दिले आहेत.

नाशिक : महापालिकेने १ एप्रिल २०१८ पासून नव्याने उभारण्यात येणाऱ्या मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चित करत त्यात पाच ते सहा पटीने वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत असताना आयुक्त तुकाराम मुंढे मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यापूर्वी शहरात मोकळ्या जमिनींवरील कर वसूल केला जात नव्हता, तो आपण सुरू केल्याचे सांगत आयुक्तांनी कोणत्याही प्रकारच्या मोकळ्या जमिनीवर करआकारणी होणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे शेतजमिनीवरही करआकारणीचे संकेत दिले आहेत. महापालिकेने केलेल्या मिळकत सर्वेक्षणात सुमारे ५९ हजार मिळकती नव्याने आढळून आल्या आहेत. या नव्या मिळकतींचे करयोग्य मूल्य निश्चित करत ते पाच ते सहा पटीने वाढविले आहे. आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी याबाबत भाजपावरच निशाणा साधला तर महापौर रंजना भानसी यांच्यासह भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. या साºया पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली.  आयुक्तांनी सांगितले, दरवर्षी नव्याने तयार होणाºया मिळकतींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करावे लागते. आतापर्यंत शहरात पूर्वी ठरलेल्या करयोग्य मूल्याधारितच करवसुली केली जात होती. मिळकत सर्वेक्षणात नव्याने मिळकती निदर्शनास आल्याने त्यांचे करयोग्य मूल्य निश्चित करण्यात आले. तसेच ज्या इमारती १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या वर्षभरात उभ्या राहतील त्यांना हे करयोग्य मूल्य आकारले जाईल. त्यानुसार, दरवर्षी ३१ मार्चपूर्वी जे कुणी आयुक्त कार्यरत असतील त्यांना दरवर्षी असे मूल्य निश्चित करण्याचा अधिकार असतो. याशिवाय, नाशिकमध्ये मोकळ्या जमिनींवर करआकारणी केली जातच नव्हती. ती आता होणार असल्याचे सांगत आयुक्तांनी सदर करयोग्य मूल्य निश्चितीचे समर्थन केले. सदरचा विषय महासभेवर नेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मोकळ्या जागेचा करएखाद्या जागामालकाने कमिन्समेंट सर्टिफिकेट घेत जागेवर इमारत बांधकामाचा निर्णय घेतला असेल तर संबंधित जागामालकाला सहा वर्षे मागे जाऊन सदर मोकळ्या जागेवरील कर महापालिकेला आधी भरावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर करआकारणी केली जाणार असल्याने त्यात शेतजमिनीचाही समावेश होतो. परिणामी, शेतकºयांना जमीन म्हणून महापालिकेला कर अदा करावा लागणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे