कांद्याच्या चोरीने व्यावसायिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:28 IST2019-12-10T00:27:33+5:302019-12-10T00:28:14+5:30
नाशिक जिल्हा आणि कांदा हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावर्षी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने सर्वसामन्य माणसाच्या रोजच्या वापरातून कांदा हद्दपार झाला आहे.

कांद्याच्या चोरीने व्यावसायिक अडचणीत
नाशिक : नाशिक जिल्हा आणि कांदा हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावर्षी कांद्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने सर्वसामन्य माणसाच्या रोजच्या वापरातून कांदा हद्दपार झाला आहे. कांद्याला सोन्याचे दर मिळाल्याने कांद्याची चोरी झाल्याने आडगाव परिसरातील वाहतूक (ट्रान्सपोर्ट) व्यावसायिक अडचणीत आले आहे.
कांद्याचे भावाने उच्चांक गाठल्याने कांदा वापरातून हद्दपार झाला आहे. कांद्याला सोन्याचे मोल मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी शिल्लक असलेला मालविक्रीसाठी आणला आहे. पण या कांद्यामुळे आडगाव परिसरातील कोणार्कनगर येथे राहत असलेले अच्युतानंद तिवारी यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यांच्या मालवाहतूक ट्रकमध्ये कांदा पाठविण्यात आला होता. पण वाहनासोबत गेलेल्या चालकाने ५९ किलो वजनाच्या ४९ गोण्या विक्री केल्या आहे. त्यामुळे उर्वरित माल वाहनासह व्यापाऱ्यांनी जमा केली असल्यामुळे वाहतूक व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेऊन तक्र ार दाखल करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांनी तक्र ार घेण्यास नकार दिला.
वाहन व्यापाºयाच्या ताब्यात तर माल ट्रकचालकाने परस्पर विक्र ी केला असल्यामुळे भाडे आणि पुढील व्यवसाय बुडाला असून, व्यवसाय सोडून पोलीस स्टेशनमध्ये चकरा माराव्या लागत आहे.