नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांच्या कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:17 PM2020-09-05T16:17:54+5:302020-09-05T16:19:38+5:30

नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Commencement of Shivar road works in Nandurshingote area | नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांच्या कामांना सुरुवात

नांदूरशिंगोटे येथे कामाच्या शुभारंभप्रसंगी लक्ष्मण शेळके, दामोधर गर्जे, तुकाराम मेंगाळ, दत्ता मुंगसे, संदीप शेळके आदी.

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये समाधान : चिखलातून काढावी लागत होत वाट

नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नांदूरशिंगोटे येथील गर्जे वस्तीकडे जाणाºया रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके व माजी सरपंच दामोधर गर्जे यांच्या हस्ते करण्यात आला. नांदूरशिंगोटे येथील व परिसरातील शिवार रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली होती. त्यामुळे शेतक?्यांना चिखलातून वाट काढावी लागत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर स्थानिक पदाधिकाºयांनी याबाबत जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे यांच्याकडे शिवार रस्त्याबाबत गाºहाणे मांडले होते. प्रामुख्याने गर्जेवस्तीकडे जाणाºया रस्त्यावरील नाल्यांमधील पाण्यातून परिसरातील शेतकºयांना ये जा करावी लागत होती. तसेच शेतातील शेतमाल बाजारात नेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. आमदार कोकाटे यांच्या निधीतून या शिवार रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. सदरच्या नाल्यात सिमेंट पाईप टाकून तसेच त्यावरील रस्त्यावर मुरुम टाकून मजबूतीकरण करण्यात येत आहे. याप्रसंगी तुकाराम मेंगाळ, दत्ता मुंगसे, संदीप शेळके, नामदेव गर्जे, सुरेश कुचेकर, सुदाम आव्हाड, शरद दोंड, सोमनाथ शेळके, दिनकर वाघचौरे, सुरेश शेळके आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नाल्यातील सिमेंट मोरीचे काम झाल्याने परिसरातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

Web Title: Commencement of Shivar road works in Nandurshingote area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.