शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

१ लाख १६ हजार गणेशमूर्तींचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:59 AM

गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नाशिक : गणेश विसर्जनानिमित्त महापालिकेच्या वतीने सहाही विभागांमध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव व गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. यावर्षीदेखील महापालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरात एकूण १ लाख १६ हजार ८९६ मूर्ती व ११४.४५ टन इतके निर्माल्य संकलन झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी ५३ हजाराने मूर्ती संकलनामध्ये घट झाली आहे.  पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महापालिका व विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांसह शाळा, महाविद्यालयांमधून आवाहन केले जात होते. निर्माल्य, मूर्ती संकलनासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत महापालिके ला सहकार्य केले. पर्यावरणपूरक उत्सवासाठी नाशिककरांमध्ये कमालीची जनजागृती होत असली तरी यावर्षी ५३ हजाराने मूर्ती संकलन कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गावठाण परिसर असलेल्या नाशिक पूर्व व नाशिकरोड या विभागांमध्ये अन्य चार विभागांच्या तुलनेत मूर्ती संकलनास कमी प्रतिसाद लाभला.गोदाकाठ, तपोवन, सोमेश्वर, नासर्डीकाठ, गंगापूररोड, टाकळी, दसक, विहितगाव, देवळाली गाव, सातपूर, सिडको, इंदिरानगर, भारतनगर आदी ठिकाणी महापालिकेच्या वतीने मूर्ती, निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. तसेच शहरातील या भागांमध्ये बहुतांश स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत मूर्ती संकलनाला हातभार लावल्याचे चित्र पहावयास मिळाले.अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर शहरातील पूर्व विभागात ७ हजार १०४, पश्चिममध्ये १३ हजार ४१९, सिडकोमध्ये १३ हजार १४४, सातपूर विभागात ३७ हजार ५२१, नाशिकरोड विभागात ७१५८ तर पंचवटी या गावठाण विभागात सर्वाधिक ३८ हजार ५५० मूर्तींचे संकलन करण्यास महापालिका प्रशासनाला यश आले. यासाठी विभागनिहाय एकूण ६८ वाहने उपलब्ध क रून देण्यात आली होती.अमोनिअम बायकार्बोनेटचा पुरवठामहापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांना एकूण ४.२ टन इतक्या अमोनिअम बायकार्बोनेट पावडरचा मोफत पुरवठा करण्यात आला. या पावडरचा वापर नागरिकांनी विविध सोसायट्यांसह घरगुती गणेश विसर्जनासाठी केला. या पावडरमुळे मूर्ती विरघळण्यास मदत झाली.महापालिकेने संकलित झालेल्या मूर्ती, निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी विभागनिहाय वाहनेही उपलब्ध करून दिली होती. तसेच कृत्रिम तलाव निर्मितीसाठी लोखंडी पात्रांचा केंद्रांवर पुरवठा केला होता. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात सोय झाली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाganpatiगणपतीenvironmentवातावरणwater pollutionजल प्रदूषण