शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

राष्टवादी काँग्रेसचे कोलमडलेले नियोजन युतीला फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:05 AM

अपेक्षेप्रमाणे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना निफाड तालुक्याने आघाडी दिली आहे. यंदा मोदी लाट सुप्त होती हेही या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

अपेक्षेप्रमाणे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना निफाड तालुक्याने आघाडी दिली आहे. यंदा मोदी लाट सुप्त होती हेही या निकालावरून स्पष्ट झाले आहे.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक चर्चेचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे शेतीप्रधान निफाड विधानसभा मतदारसंघ होय. गेल्या तीन निवडणुकीत ज्या उमेदवाराला तालुक्यातून आघाडी तोच विजयी असे समीकरण झाले आहे. यंदादेखील डॉ. भारती पवार यांना मिळालेली आघाडी पाहता निफाड युतीचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले.२००९ आणि २०१४मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांना अनुक्रमे ३१ आणि ६१ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यंदा ते काही प्रमाणात कमी झाले असले तरी त्याला इतर राष्ट्रीय व स्थानिक कारणं आहेत. वंचित बहुजन आघाडीची निर्मिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोलमडलेले नियोजन आणि विरोधकांनी केलेला प्रचार अपयशी ठरला आहे. राखीव असलेल्या दिंडोरी लोकसभा क्षेत्रात निफाड विधानसभेमधील गेल्या दशकभराचे राजकारण आमदार अनिल कदम आणि दिलीप बनकर यांच्या गटाभोवती फिरते. विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षीय जाळे प्रत्येक गटात पसरले असल्याने त्याचा फायदा पक्षाला होताना दिसतो, तर पिंपळगाव बाजार समिती आणि शरद पवारांना मानणाऱ्या वर्गामुळे राष्ट्रवादी येथे पाय रोवून आहे. येथील लोकसभेचा उमेदवार कुणीही असो राजकारण हे दोघांभोवतीच फिरते. भाजपची तालुक्यातील पक्ष बांधणी दिसत नसली तरी कार्यकर्त्यांकडे असलेली गाव, त्यांनी घरोघरी केलेला प्रचाराने पवारांना आघाडी मिळाली.दिलीप बनकर सभापती असलेल्या बाजार समितीत शेतकऱ्यांनी पन्नास पैशांचा मुद्दा चर्चेत आणला, तर अनेकांनी गील पराभव डोक्यात ठेवत भारती पवारांच्या पारड्यात वजन टाकले.या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणामनिफाड विधानसभा सर्वसाधारण असल्याने निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे असतात. यंदादेखील सेना आणि राष्टÑवादीत सामना रंगेल असे चित्र दिसत आहे. एकंदरीतभाजप उमेदवारामुळे युतीला आपला धर्म पाळण्याचा आदेश हायकमांडकडून पुन्हा दिला जाईल. असले तरी मोदींच्या सभेत व्हीआयपी कक्षेत बसलेली राष्ट्रवादीतील श्रीमंत लॉबी आणि इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले काही स्थानिक प्रतिनिधी युतीचा धर्म विधानसभेला पाळतील का हा खरा प्रश्न आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी