शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
2
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
5
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
6
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
7
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
8
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
9
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
10
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
11
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
12
शाळांच्या सहलीसाठी मिळणार 'एसटी'च्या नव्या बसेस; विद्यार्थ्यांना घेता येणार संस्मरणीय अनुभव
13
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
14
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
15
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
16
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
17
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
18
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
19
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
20
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कहर; पंधरवड्यापासून नाशिककर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:54 IST

पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

नाशिक : पंधरवड्यापासून नाशिककर कडाक्याची थंडी अनुभवत आहेत. किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे थंडीने शहरासह जिल्ह्यात कहर केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी (दि.२९) या हंगामातील सर्वाधिक नीचांकी ५.१ इतके किमान तापमान नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक दिवस-रात्र अंगावर उबदार कपडे परिधान करून ठेवणे पसंत करत आहेत.यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा पाच अंशांपर्यंत घसरला होता. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ इतके नीचांकी तापमान त्या हंगामात नोंदविले गेले होते. मात्र चालू वर्षी डिसेंबरअखेर पारा ५ अंशांपर्यंत घसरला आहे. गेल्या वर्षाची नोंद मागे पडली असून, ५.१ ही यावर्षी हंगामातील नीचांकी नोंद ठरली. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे नाशिक गारठले असून, निफाड तालुका गोठलाही आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया नाशिकमधील बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे चांगलेच धास्तावले आहे. शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा कायम होता. तसेच थंड वाºयाचा वेगदेखील अधिक राहिल्यामुळे दिवसभर ऊन पडून न पडल्यासारखेच होते. परिणामी वातावरणात उष्मा निर्माण होऊ शकला नाही. सूर्यास्तानंतर पुन्हा थंड वारे अधिक वेगाने वाहू लागल्याने मध्यरात्रीपर्यंत थंडीचा कडाका अधिकच वाढला होता.चार वर्षांत प्रथमच पारा ५ अंशांवरगेल्या चार वर्षांमध्ये प्रथमच किमान तापमान ५ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे ५.१ ही नोंद या चार वर्षांतील नीचांकी ठरली. ६ जानेवारी २०१३ रोजी शहराचे किमान तापमान ४.४ तर ९ फेब्रुवारी २०१२ रोजी २.७ अंश, तर ७ जानेवारी २०११ रोजी ४.४ अंशांवर पारा घसरला होता. एकूणच २०१४ पासून सर्वाधिक थंडीचा कडाका यावर्षी जाणवत आहे.सर्दी-तापाचे रुग्ण वाढलेथंडीचा वाढता कडाका नागरिकांना असह्य होऊ लागला आहे. वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी-पडसे, थंडी-तापाचे रुग्ण पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्यास प्राधान्य द्यावे. थंड खाद्यपदार्थ खाणे टाळावे. जास्त रसदार फळेदेखील आहारात खाऊ नये. पाणी उकळून प्यावे, अशा उपाययोजना शहरातील डॉक्टरांनी सुचविल्या आहेत.शहराचे किमान तापमान असे (अंशात)दिनांक कमाल किमान२० डिसेंबर २७.१ ९.३२१ डिसेंबर २९.० ८.३२२ डिसेंबर ३०.१ ९.६२३ डिसेंबर ३०.० ११.२२४ डिसेंबर ३०.२ १२.३२५ डिसेंबर ३०.३ १४.३२६ डिसेंबर २६.६ १२.६२७ डिसेंबर २५.४ ५.७२८ डिसेंबर २३.९ ६.९२९ डिसेंबर २५.३ ५.१

टॅग्स :TemperatureतापमानenvironmentवातावरणNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी