शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

थंडीचा जोर झाला कमी; नाशिककरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:07 IST

गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

ठळक मुद्देरुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला

नाशिक : मागील दहा दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तपमानाचा पारा ७.९अंशापर्यंत खाली घसरला. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.आठवडाभरापासून शहराच्या किमान तपमानाचा पारा दहा अंशाच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानकपणे ७.९ अंशापर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशापर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळुहळु कमी होत चालली आहे. सोमवारी (दि.२४) किमान तपमानाचा पारा १२.२अंशापर्यंत वर सरकला. मंगळवारी किमान तपमान ११.२ तर कमाल तपमान ३० अंश इतके नोंदविले गेले होते. एकूणच कमाल तपमानाचा पारादेखील २५ अंशावरुन पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तपमान तीस अंशापर्यंत आले असून किमान तपमानदेखील १२अंशापर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी दुपारपासून ढगाळ हवामान शहरात दाटल्यामुळे कमाल तपमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमाल तपमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीणभागदेखील गारठला होता. निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्ष बागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.दिवसभर नागरिकांना बोचऱ्या थंड वा-याचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर ऊबदार कपडे परिधान करुन बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते; मात्र दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह, तापाचे रुग्णही वाढले होते. सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराच्या तक्रारी घेऊन येणा-यांची संख्या तापमान वाढल्याने नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान