खरातच्या मोबाइलमध्ये खास नंबरसाठी कोडवर्ड; अर्थ लावण्याचे तपास पथकासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 08:09 IST2026-03-30T08:09:21+5:302026-03-30T08:09:21+5:30

मोबाइलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय

Codewords for specific numbers found in Ashok Kharat mobile phone interpreting their meaning poses a challenge for the investigative team | खरातच्या मोबाइलमध्ये खास नंबरसाठी कोडवर्ड; अर्थ लावण्याचे तपास पथकासमोर आव्हान

खरातच्या मोबाइलमध्ये खास नंबरसाठी कोडवर्ड; अर्थ लावण्याचे तपास पथकासमोर आव्हान

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात त्याच्या मोबाइलमधून महत्त्वाचे धागेदोरे समोर येत आहेत. अडीच हजारांहून अधिक नंबर 'कोडवर्ड' मध्ये सेव्ह असल्याने तपास अधिक गूढ बनला आहे.

मोबाइलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय आहे. दुसरीकडे, पीडित महिलांचे नंबर मात्र जाणूनबुजून मुख्य मोबाइलमध्ये सेव्हच न करण्याची काळजी खरात घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता आणि त्या फोनचे सिम कार्डही त्याच्या नावावर नसल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. एसआयटीचे तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात याबाबत महत्त्वाचा खुलासा करताना सांगितले की, खरातच्या मोबाइलची क्लोन कॉपी मिळाली असून त्याचे सखोल विश्लेषण अद्याप बाकी असून डेटा तपासला जाणार आहे.

राजकीय कनेक्शनची होणार पडताळणी 

तपासात राजकीय कनेक्शनची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. खरातचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या मोबाइलचीही पडताळणी करण्यात येत आहे. त्याच्या आणि खरातच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक एकमेकांशी जुळतात का, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या तपासातून आणखी नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रोज नवनवीन धागेदोरे समोर येत असल्याने तपास अधिक गंभीर बनत चालला आहे.
 

Web Title : खर्राटे के फोन में कोडित नंबर, जांचकर्ताओं के लिए चुनौती।

Web Summary : धोखेबाज खर्राटे के फोन में कोडित नंबर, जांच में बाधा। प्रभावशाली लोगों के नंबर डमी नामों में सहेजे जाने का संदेह। पीड़ितों के लिए अलग फोन का इस्तेमाल किया। पुलिस बरामद डेटा का विश्लेषण कर रही है; राजनीतिक संबंधों की जांच की जा रही है।

Web Title : Kharaat's phone: Coded numbers pose challenge for investigators.

Web Summary : Fraudster Kharaat's phone reveals coded numbers, hindering investigation. Influential people's numbers are suspected to be saved in dummy names. He used separate phones for victims. Police are analyzing recovered data; political connections are probed.