शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागरी कामांवर आचारसंहितेचे सावट

By admin | Updated: August 18, 2016 00:45 IST

नागरी कामांवर आचारसंहितेचे सावट

नाशिक : देशात बाराही महिने कोठे ना कोठे निवडणुकीची आचारसंहिता सुरू असते व त्याचे परिणाम विकासकामांवर होत असतात. देशाच्या पंतप्रधानांच्या ठाम मतानुसार आगामी सहा महिन्यांच्या काळात होऊ घातलेल्या विविध निवडणुकांमुळे नाशिक जिल्ह्यातील नागरी कामांवर आचारसंहितेचे सावट उभे ठाकले आहे. राजकीय पक्ष व पदाधिकारी या निवडणुकीची तयारी करीत असताना, प्रशासनातील अधिकारीदेखील त्यात गुंतून पडल्याने विकासकामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डिसेंबर महिन्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघातील सदस्याची म्हणजेच आमदार सुधीर तांबे यांची मुदत संपुष्टात येत असून, त्याच काळात जिल्ह्यातील येवला, मनमाड, सटाणा, त्र्यंबकेश्वर, भगूर व इगतपुरी या सहा नगरपालिकांच्या विद्यमान सदस्यांच्याही कारकिर्दीचा समारोप आहे. निवडणूक नियमाप्रमाणे साधारणत: विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच नवीन सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक आहे, त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात पदवीधर व नगरपालिकांच्या निवडणुका पार पाडल्या जातील व या निवडणुकांची आचारसंहिता सप्टेंबरच्या तिसऱ्या वा चौथ्या आठवड्यात लागू होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकांच्या तयारीत प्रशासनातील अधिकारी गुंतलेले असतानाच, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर अखेर वा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागू होईल. याचाच अर्थ जिल्ह्यातील विकासकामे व रखडलेल्या प्रकल्पांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विद्यमान पदाधिकारी असो वा शासकीय अधिकारी यांच्यासाठी सप्टेंबर महिना अतिशय महत्त्वाचा आहे; मात्र हा संपूर्ण महिना सण, उत्सवाचा असून, याकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वसाधारण बैठका होऊन त्यात नागरी कामांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास पदाधिकाऱ्यांना वेळ मिळेलच, याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासकामे ठप्प होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)