CNP helps two buses to students with disabilities in Prabodhini | सीएनपीतर्फे प्रबोधिनीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दोन बसची मदत
सीएनपीतर्फे प्रबोधिनीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दोन बसची मदत

नाशिक : प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने मानसिक अपंग अर्थात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन बसेसची मदत देण्यात आली. प्रबोधिनीच्या सातपूर शाळेत चलार्थपत्र मुद्रणालयाचे महाव्यवस्थापक एस. पी. वर्मा यांच्या हस्ते या बसेसचे वितरण करण्यात आले.
प्रेसच्या सीएसआर फंडातून विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक फिजीओथेरपीची साधनेदेखील संस्थेला प्रदान करण्यात आली. सीएनपीचे मुख्य व्यवस्थापक वासुदेव कमलस्कर, सुजितकुमार मुखोपाध्याय, उपव्यवस्थापक सुनील दुपारे, पी. के. विश्वास, अर्पित धवन, जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुन्नरे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होेते. अध्यक्ष रोहिणी ढवळे यांनी मनोगत व्यक्त करून सीएनपीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. दिलीप भगत यांनी प्रास्ताविक, तर गीतांजली हट्टंगडी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सचिव रमेश वैद्य, शलाका पंडित, पूनम यादव, सुजाता बिल्लाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वर्मा यांनी ही मदत अत्यंत योग्य कार्यासाठी वापरली जाणार असल्याचे समाधान खूप मोठे असल्याचे यावेळी सांगितले. या बसेसमुळे विद्यार्थ्यांची ने-आण सुकर होणार असून, उपकरणांमुळे विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम मिळून त्यांचे आरोग्य सुदृढ राहणे शक्य होणार असल्याचे वर्मा यांनी नमूद केले.

Web Title:  CNP helps two buses to students with disabilities in Prabodhini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.