ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 01:04 AM2021-11-15T01:04:07+5:302021-11-15T01:04:42+5:30

येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

Cloudy weather hits onion crop | ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला फटका

राजापूर परिसरात कांद्यावर फवारणी करताना शेतकरी.

Next
ठळक मुद्देदुष्काळात तेरावा : यंदा लागवडीऐवजी पेरणीचा पर्याय

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळेकांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, यंदा रोपांअभावी उत्पादकांनी कांदा लागवडीऐवजी पेरणीचा मार्ग अवलंबला आहे.

सध्या महागाईत भरमसाठ वाढ झाली असल्याने रासायनिक खते कीडनाशके, शेती औषधाची महागाई भरमसाठ वाढ झालेली. त्यात निसर्गाच्या हवामान बदलामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहेत . लाल कांदा लागवड झालेली असून, अपेक्षित त्या प्रमाणात यंदा कांदा रोपाअभावी सर्वच शेतकऱ्यांनी कांदा पेरणीचा पर्याय अवलंबला आहे. आता सध्या कांदा जगविण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात महागडी औषधांची फवारणी करतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निसर्गाचा हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. सध्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशक यांचा कांदा पीक वाचविण्यासाठी खर्च होत आहे. कांद्याला कसा बाजारभाव मिळतो, हे माहीत नसले तरी सध्या शेतकरी आशावादी राहून आपल्या शेतामध्ये राबराब कष्ट करताना दिसत आहेत. पीक उत्पादन खर्च यात ताळमेळ बसेल की नाही, याचीही शाश्वती नसते, तरीही शेतकरी आपल्या कुटुंबाची जबाबदारी संपूर्णपणे शेतीवरच पार पाडीत असतो. शेतीत लागणारी रासायनिक खते, मजुरी, फवारणी असा एक एकरासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांचा झालेला आहे. तरीदेखील आज ना उद्या योग्य भाव मिळेल, या अपेक्षेने पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कोट...

शेतकऱ्याला आशावादी राहून आपल्या शेतामध्ये काबाडकष्ट करून शेती कामात व्यस्त राहावे लागते; पण निसर्ग व हवामान बदलामुळे कांदा पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने कांद्यावर मावा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मागे संकटांची मालिका सुरूच असते; परंतु शासन त्यावर ठोस मार्ग काढत नाही.

- समाधान चव्हाण, शेतकरी राजापूर.

Web Title: Cloudy weather hits onion crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.