शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

‘त्या’ बॅगेत सापडले कपडे अन् मतदार याद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:03 AM

डोंगर पोखरून निघाला उंदीर या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला आला. पूर्ण भरलेल्या एका बॅगची अधिकऱ्यांच्या उपस्थितीत सूक्ष्म तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या सापडल्या.

घोटी : डोंगर पोखरून निघाला उंदीर या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला आला. पूर्ण भरलेल्या एका बॅगची अधिकऱ्यांच्या उपस्थितीत सूक्ष्म तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या सापडल्या; मात्र या घटनेत लाखोंची रोकड सापडल्याची अफवा सोशल मीडियावर चांगलीच पसरली.टाके घोटी येथील टोलनाक्याजवळ एका हॉटेलमध्ये मतदारांना वाटण्यासाठी लाखोंची रक्कम आली आहे. पदाधिकाऱ्यांकडे या रकमेचे वाटप होत आहे अशा आशयाची तक्र ार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्चना भाकड यांच्याकडे एका तक्रारदाराने केली. तातडीने त्यांनी भरारी पथकाचे प्रमुख एन. टी. शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. माळी यांना कारवाई करण्याबाबत कळविले. भरारी पथकाने सदर हॉटेलास पथकासह भेट दिली. संशयास्पद व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून संपूर्ण हॉटेलची तपासणी केली, यामध्ये एक बॅग संशयास्पद स्थितीत आढळून आली. पंचनामा करून कारवाई करण्यासाठी बॅग उघडली असता त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या आढळून आल्या. यामुळे भरारी पथकाला हात हलवत माघारी फिरावे लागले; मात्र इगतपुरी तालुक्यातील गावागावांत या प्रकरणाची विशेष चर्चा रंगली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस