शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बंद उद्योगांकडे चार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:08 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देथकबाकी वसुलीचे आव्हान : महापालिकेने आतापर्यंत केले १७ कोटी वसूल

गोकुळ सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेची थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहे. मार्चअखेर असल्यामुळे आत्तापर्यंत ४२ मिळकतींना जप्ती वॉरंट बजावण्यात आले असून, २५ मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. सातपूर विभागातून घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करांची आतापर्यंत ४५ टक्के म्हणजेच जवळपास १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली असली तरी उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न विभागीय कार्यालयाकडून केला जात आहे. मात्र ३० ते ३५ बंद कारखान्यांकडे असलेली जवळपास ४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.सर्वसामान्य नागरिकांकडून महापालिकेची थकबाकी नियमित वसूल होत असते. मात्र बड्या लोकांकडे थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने अशी थकबाकी वसुली करणे महत्त्वाचे असते. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी ठोस उपाययोजना आखून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. गायकवाड यांनी सर्व प्रथम प्रत्येक मिळकतधारकास देयके वेळेवर देण्याचा प्रयत्न केला आहे. वॉरंट, सूचना पत्र पाठविले. ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.निरीक्षक आणि लिपिक यांना दररोजचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र काही बडे थकबाकीदार दाद देत नव्हते म्हणून मिळकतींच्या दारावर थकबाकीची यादी चिकटवण्यात येत आहे. १४ हजार मिळकत धारकांना सूचना पत्र देण्यात आलेले आहेत. ४२ थकबाकीदारांकडे जवळपास २३ लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांच्यावर जप्ती वॉरंट बजावण्यात आले आहे. १२ हजार नळपट्टीधारकांना सूचना पत्र देण्यात आले असून, २५ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. ७५ गाळेधारक थकबाकीदार असून थकबाकी भरली नाही तर गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. विभागीय अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भास्कर थेटे, बबन घाटोळ, रामचंद्र सूर्यवंशी, विष्णू पगार, दादा बंदावणे, पोपट बंदावणे, मनोहर बेंडकुळे, संजय निगळ, प्रभाकर बंदावने आदींसह कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत.सतरा कोटींची वसुलीयावर्षी घरपट्टी पोटी ११ कोटी ६२ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यात मागील वषार्ची मोठी थकबाकी असल्याने ४५ टक्के वसुली झाली आहे, तर यावर्षीची ७२ टक्के वसुली झाली आहे. २६ कोटी ५२ लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. पाणीपट्टी पोटी यावर्षी चार कोटी ११ लाख रुपयांची वसुली झाली आहे. १४ कोटी १७ लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. विविधकरांची वसुली एक कोटी २२ लाख रुपये झाली आहे, तर २ कोटी ७० लाख रुपयांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. एकूण सुमारे १७ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश मिळाले आहे. विविध कारणांनी बंद असलेल्या ३० ते ३५ कारखान्यांकडे तब्बल चार कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. दरवर्षी या थकबाकीत वाढ होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर