सिडकोत एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:05 IST2019-03-09T01:04:45+5:302019-03-09T01:05:59+5:30
सिडको परिसरात एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. यात एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून, त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत ६१ वर्षीय वयोवृद्धाने स्वत:ला गळफास लावून घेत जीवन संपवले.

सिडकोत एकाच दिवशी दोघांच्या आत्महत्या
सिडको : परिसरात एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. यात एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून, त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत ६१ वर्षीय वयोवृद्धाने स्वत:ला गळफास लावून घेत जीवन संपवले. या दोन्ही घटनांची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.
दत्तचौक परिसरातील मच्छिंद्र धर्मा तेली (२७) या तरुणाने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केली. गुरुवारी (दि.७) मच्छिंद्र तेली याने विषारी औषध सेवन केले. ही बाब त्याच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावर उपचार सुरू असताना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून घोषित केले. तर शिवशक्ती चौकातील दुसºया घटनेत ६१ वर्षीय बाळासाहेब नामदेव खातोळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.