Chimurdi dies after falling from second floor in Nashik | नाशकात दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

नाशकात दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू

ठळक मुद्देइमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू गॅलरीच्या जाळीतून गेला तोल पडून गंभीर जखमी रुग्णालयात उपचारादरम्यान अशिकाचा मृत्यू

नाशिक : नाशिकरोडच्या जेलरोड भागातील सिंधी कॉलनीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या ग्रीलमधून खाली पडून एका तेरा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
जेलरोड सिंधी कॉलनी येथे दुसऱ्या मजल्यावर राहणारे व्यापारी कल्पेश तारवाणी व त्याचे सर्व कुटुंब शुक्रवारी (दि.२४) सकाळी साडेअकराच्या सुमारास घरात  होते. यावेळी त्यांची तेरा वर्षांची चिमुकली अशिका कल्पेश तारवाणी ही रेंगाळत गॅलरीमध्ये आली. गॅलरीत एकटीच खेळत असताना अचानक आशिका ही अचानक गॅलरीला लावलेल्या लोखंडी ग्रीलच्या फटीतून तोल जाऊन खाली कोसळली. ही घटाना  इमारतीत काम करण्यास आलेल्या मोलकरणींच्या  लक्षात येताच तिने कटुंबियांना या घटनेची महिती दिल्यानंतर अशिकाला तातडीने जखमी अवस्थेत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी तिचे निधन झाले. अशिकाचा अशाप्रकारे दुदैर्वी मृत्यू झाल्याने तारवाणी कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  कल्पेश तारवाणी त्यांच्या विवाहानंतर आठ ते नऊ वर्षांनी त्यांना पहिले कन्या रत्न आशिकाच्या रुपाने प्राप्त झाले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Chimurdi dies after falling from second floor in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.