चिमुकल्यांनी केला मंदिर परिसर स्वच्छ

By Admin | Updated: September 29, 2014 22:28 IST2014-09-29T22:27:20+5:302014-09-29T22:28:40+5:30

चिमुकल्यांनी केला मंदिर परिसर स्वच्छ

Chimukkalei clean the temple complex | चिमुकल्यांनी केला मंदिर परिसर स्वच्छ

चिमुकल्यांनी केला मंदिर परिसर स्वच्छ

पेठ : आगामी वर्षात नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविकांना चांगल्या आणि स्वच्छ सुविधा देण्याच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या हरितकुंभ या उपक्रमांतंर्गत पेठ तालुक्यातील जि़प़शाळा गढईपाडा येथील शाळेतील चिमुकल्यांनी परिसरातील संगमेश्वर मंदिराचा परिसर स्वच्छ करून सामाजिक कार्यास हातभार लावला़
कुंभमेळ्याच्या कालावधीत ज्या भाविकांना नाशिकला जाता येत नाही असे भाविक पर्वणीच्या दिवशी पेठच्या संगमेश्वर महादेव मंदिरात हजेरी लावत असतात़ महाराष्ट्र व गुजरात राज्यातील भाविकांचे हे जागृत देवस्थान आहे़ शाळेतील विद्यार्थ्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील व परिसरातील घाणकचरा सपाई केला़ तसेच सार्वजनिक पाणवठ्यावरील परिसरही स्वच्छता केली़ यावेळी मुख्याध्यापक आऱ डी़ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली़ उपशिक्षिका रमाबाई मोरे यांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक ठिकाणांचीही स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे
सांगितले़

Web Title: Chimukkalei clean the temple complex