शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

चिमणपाडा परिसरात उजाड रानावर फुलविले नंदनवन....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 9:51 PM

दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर्गसंपदा जोपासली जाऊ शकते हे चिमणपाड्याच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देसंत तुकाराम वनग्राम योजना अधिकारी अन् ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी जगविली वनसंपत्ती

भगवान गायकवाड ।दिंडोरी : दिंडोरी, पेठ तालुक्याचा सीमाभाग म्हणजे पूर्वीचे घनदाट जंगल गेल्या काही वर्षांत वृक्षतोड होत सारे रान उजाड होत असताना अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकमेकांना सहकार्य करत या परिसराचे अक्षरश: नंदनवन केले आहे. वृक्षसंवर्धन होऊन पुन्हा वनसंपत्ती उभी राहून निसर्गसंपदा जोपासली जाऊ शकते हे चिमणपाड्याच्या गावकऱ्यांनी दाखवून दिले आहे.दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे कार्यरत असलेले तत्कालीन वनाधिकारी आर. डी. सुद्रीक यांच्यासह सहकारी वनपाल आर. व्ही. देवकर, विष्णू राऊत आदींनी गावोगावी जाऊन नागरिकांना वनसंवर्धनाचे फायदे सांगत वनसंवर्धन करण्यास प्रोत्साहन दिले. यासाठी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.वनपरिक्षेत्रात संत तुकाराम वनग्राम योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभाग व वनव्यवस्थापन यांच्यामार्फत समिती स्थापन करण्यात आली आहे. चिमणपाडा येथे वनसंरक्षण संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव आर. व्ही. देवकर व सदस्यांची नियुक्ती करत कामकाज सुरू केले. त्यात सरपंच, पोलीसपाटील व सर्व गावकऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले.ननाशी वनपरिक्षेत्रातील दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा (कवडासर) २५३.३५४ हेक्टर वनक्षेत्रात वनसंवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. कुºहाडबंदी, चराईबंदीची बंधने घालण्यात आली. सदर क्षेत्र उत्कृष्टरीत्या सांभाळण्यासोबतच सदर समितीमार्फत सन २०११-१२ मध्ये कम्मा या योजनेंतर्गत ३० हेक्टर क्षेत्रावर रोपवन करण्यात आले.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जल व मृद संधारणाची कामे करण्यात आली. साग व विविध औषधी वृक्षांचे संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यात आले. समितीने वनसंरक्षण, संवर्धन, विकास यासाठी उत्कृष्ट काम केल्याने संत तुकाराम वन योजनेमध्ये गावाची निवड होत जिल्ह्यात अव्वल होण्याचा मान मिळवला असून, चिमणपाडा आता राज्यस्तरीय स्पर्धेत पोहचले आहे.गावकºयांनी विझवला वणवाएकेरात्री अचानक या जंगलात वणवा लागला ही बाब गावकºयांना समजताच आबालवृद्ध, महिला-पुरु षांनी जंगलाकडे धाव घेत काही वेळात वणवा विझवत वनाचे संवर्धन केले. पूरक कामातून मिळालेले एक लाख रुपयांतून गावकºयांनी सोलर बसवले. वनविभागाने प्रोत्साहन देण्यासाठी काही कामे हाती घेतली. ती ग्रामस्थांनी केली त्यातून एक लाख निधी जमा झाला. गावकºयांनी त्यातून गावात सोलर दिवे बसविले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकforestजंगलStudentविद्यार्थी