खरवंडी येथे बंधाऱ्यात बुडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 00:32 IST2020-12-09T20:27:47+5:302020-12-10T00:32:27+5:30
येवला : तालुक्यातील खरवंडी येथे बंधाऱ्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

खरवंडी येथे बंधाऱ्यात बुडून मुलाचा मृत्यू
ठळक मुद्देपाय घसरून बंधाऱ्यात पडला.
येवला : तालुक्यातील खरवंडी येथे बंधाऱ्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खरवंडी येथे बांधाऱ्या जवळ खेळत असताना रोशन सुनील आहेर (१३) हा पाय घसरून बंधाऱ्यात पडला. त्यातच तो मृत्यू पावला. नातेवाईकांनी रोशन यास बाहेर काढून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.