विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:36 IST2020-07-20T00:33:02+5:302020-07-20T00:36:09+5:30

येवला तालुक्यातील एरंडगाव येथील किरण जनार्दन गायकवाड (१७) या विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

Child dies of electric shock | विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

येवला : तालुक्यातील एरंडगाव येथील किरण जनार्दन गायकवाड (१७) या विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. बारावीतील विद्यार्थी किरण जनार्दन गायकवाड रविवारी, (दि. १९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतातील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेला होता. यावेळी शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. येवला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Child dies of electric shock