मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार खातेप्रमुखांची ‘उजळणी’

By Admin | Updated: January 31, 2016 00:13 IST2016-01-31T00:12:18+5:302016-01-31T00:13:08+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार खातेप्रमुखांची ‘उजळणी’

Chief Executive Officer to review 'Head of the departments' | मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार खातेप्रमुखांची ‘उजळणी’

मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार खातेप्रमुखांची ‘उजळणी’

नाशिक : तुंबलेल्या फाईली आणि रखडलेल्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर आता मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येत्या ५ फेब्रुवारी रोजी सर्व खातेप्रमुखांची मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यासमवेत वन टू वन बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीमागील उद्देश प्रत्येक खातेप्रमुखाला मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यासमोर बसवून नेमका खर्च न होण्याची कारणे कोणती याबाबत सविस्तर विचारणा करणार असल्याचेही कळते. गेल्या महिन्याभरापासून मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व खातेप्रमुखांची वेळोवेळी आढावा बैठक घेऊन अखर्चित निधीबाबत विचारणा केली आहे. मात्र प्रत्येक वेळी खर्च न होण्याची वेगवेगळी कारणे पुढे येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निधी वेळेत खर्च न होण्याचे नेमके कारण कोणते? याचा या बैठकीत आढावा घेऊन त्यावर संबंधित खातेप्रमुखांना विचारणा करण्यात येणार आहे.
यावर्षी जिल्हा प्रशासनाने आणि मंत्रालय पातळीवर मार्चअखेर हा ३१ मार्चला नव्हे, तर १५ मार्चलाच बंद होणार असल्याने निधी खर्च न झाल्यास तो परत जाण्याची नामुष्की जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर व पर्यायाने पदाधिकाऱ्यांवर येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Executive Officer to review 'Head of the departments'