शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकारीविना कळवण नगरपंचायतीचा कारभार ठप्प

By admin | Updated: May 15, 2016 22:32 IST

मागणी : अशोक चव्हाण यांना लक्ष घालण्यासाठी साकडे

कळवण : नगरपंचायतीमध्ये गेल्या पंधरा महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांअभावी प्रशासन पूर्णत: ढेपाळले असून, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने जनतेची कामे कशी करावी, असा प्रश्न सर्वानाच पडला आहे . जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये अशीच परिस्थिती असल्याने याप्रश्नी कळवण येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित आदिवासी वनहक्क परिषदेला आलेल्या माजी मुख्यमंत्री,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लक्ष घालावे, अशी मागणी कळवण नगरपंचायतचे वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश पगार, काँग्रेसचे नगरसेवक मयुर बहीरम, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रोहिणी महाले यांनी केली आहे. याप्रश्नी राज्यातील नवनिर्मित नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारींसह प्रमुख प्रशासकीय यंत्रणा नियुक्ती करण्याबाबत राज सरकारनचे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. नगरपंचायतीला ग्रामपंचायती पेक्षा जादा विकास निधी येत असल्याने जनतेत ही आशा निर्माण झाली होती. परंतु नगरपंचायतीची निवडणूक घोषित होताच नागरिकांनी निवडणुकीत हिरीरीने सहभाग घेतला. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली. त्याला आता सात महिने झाले. मात्र नगरपंचायतीच्या कारभारालाच पूर्ण खीळ बसली आहे.नागरिक नगरपंचायतीत चकरा मारून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी यांना भेटतात. मात्र कागदपत्रे व दाखले कशी द्यायचे, याबाबत देण्याचे अधिकार कोणाकडे आहे याचा उलगडा पदाधिकाऱ्यांना व नगरसेवकांना होत नसल्याने हतबल झाले आहे. कळवण शहरातील प्रशासन ठप्प झाले आहे. कळवण नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने आणि संपूर्ण कामकाज ठप्प पडले आहे. कळवण शहरातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करण्याची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यांची मानसिकता आहे. पण, यंत्रणा नसल्याने पदाधिकारी व नगरसेवक हतबल झाले आहेत. (वार्ताहर)