कॅमेरा खरेदीच्या नावाखाली फसवणूक

By Admin | Updated: April 16, 2017 01:22 IST2017-04-16T01:21:49+5:302017-04-16T01:22:03+5:30

कॅमेरा खरेदीच्या नावाखाली फसवणूक

Cheating in the name of purchase of camera | कॅमेरा खरेदीच्या नावाखाली फसवणूक

कॅमेरा खरेदीच्या नावाखाली फसवणूक

नाशिक : आॅनलाइन बुक केलेल्या कॅमेऱ्यासाठी बँकेत साठ हजार रुपये भरूनही कॅमेरा न देता विनयनगरमधील एका दाम्पत्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़
नीलेश यशवंत ठाकरे यांच्या फिर्यादीनुसार त्यांना कॅनन कंपनीचे दोन कॅमेरे विकत घ्यायचे असल्याने त्यांनी आॅनलाइन वेबसाईट सर्च करून कॅमेरे बुक केले़ त्याचे साठ हजार रुपये २२ व २३ फेब्रुवारी रोजी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यामध्ये भरले व किरणकुमार नामक व्यक्तीकडे फोनद्वारे चौकशी केली असता १० हजार रुपये कस्टम ड्यूटीसाठी लागतील, असे सांगितले व कॅमेरा न देता फसवणूक केली़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आॅनलाइन वस्तु खरेदीत फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Cheating in the name of purchase of camera