शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बंदी असताना थर्माकॉल, प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 6:58 PM

गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे फॅड आणण्यात आले होते. आता बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर थर्माकॉलच्या मखरांची आणि खुल्या थर्माकॉलची बाजारपेठेत विक्री होताना दिसून येत आहे. मात्र, महापालिकेच्या संबधित विभागांकडून कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून प्लास्टिक बंदी पुन्हा एकदा कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देनाशिकमध्ये प्लास्टीक बंदीला हरताळ थर्माकॉल, प्लास्टीक साहित्याची विक्री

नाशिक : गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे फॅड आणण्यात आले होते. आता बंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर थर्माकॉलच्या मखरांची आणि खुल्या थर्माकॉलची बाजारपेठेत विक्री होताना दिसून येत आहे. मात्र, महापालिकेच्या संबधित विभागांकडून कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून प्लास्टिक बंदी पुन्हा एकदा कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गतवर्षी  कोणतीही पूर्वसूचना न देता प्लास्टिक बंदी जाहीर केली होती. हा निर्णय झाल्यानंतर पुढील काही महिन्यात जोरदार अंमलबजावणी करण्यात आली. यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व प्रदूषण महामंडळाने कारवाईचा धडाका लावत अनेक दुकानदारांना ५ हजारांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व थर्माकॉलचा समावेश होता. परंतु गणेशोत्सव अगदीच तोंडावर आल्याने व सर्व वस्तू अधीच तयार झाल्या होत्या.त्यामुळे सरकारने नमती भूमिका घेत गणेशोत्सवातील प्लास्टिकच्या काही वस्तूंना परवानगी दिल्याने व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात मखर विकले होते. परंतु, आता प्लास्टिक बंदी होवून वर्षभराचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात थर्मार्काकॉल दिसणारही नाही अशी पर्यावरण प्रेमींची अपेक्षा होती. पण तसे न होता यावर्षी खुल्या थर्माकॉलसह काही ठिकाणी तयार मखरही विक्रीसाठी ठेवल्याचे  दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या दिवसांपासून नाशिक महापालिकेने प्लास्टिक बंदीच्या अंमलबजाणीसाठी काही व्यावसायिकांवर कारवाई केलेली असतानाही थर्माकॉलची विक्री कशी होते? असा सवाल उपस्थित होत आहे. सजावटीच्या साहित्यात प्लास्टीक वस्तूराज्यात पास्टिक बंदी लागू असताना ही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मखर सजावटीच्या विविध साहित्यात प्लास्टीकच्या वस्तू असल्याचे दिसून येत असून थर्माकॉलचीही खुलेआम विक्री आणि वाहतूक होत आहे. त्याचप्रमाणे थर्माकॉलसह प्लास्टीकच्या पाना फुलांच्या वेली, सजावटीच्या कमानी, कृत्रिम लॉन, नैर्सगिक सजावटीचा सेट, फुलदाण्या व कृत्रिम फुले यासह अन्य वस्तूंंचाही यात समावेश असून याची आवकही मोठ्या प्रमाणात असताना नगरपालिका किंवा प्रदूषण मंडळाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणNashikनाशिकenvironmentपर्यावरणPlastic banप्लॅस्टिक बंदी