शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लखमापुर ग्रामपंचायतीवर नवीन चेहऱ्यांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 14:48 IST

लखमापुर : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील पंचवार्षिक निवडणूकीत नवीन चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन माजी सरपंचाचा पराभव झाल्याने आता गावगाड्याची सूत्र नवीन चेहऱ्याकडे लखमापुरवासीयांनी दिले आहे.

लखमापुर : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील पंचवार्षिक निवडणूकीत नवीन चेहऱ्यांनी बाजी मारली आहे. अटीतटीच्या या निवडणुकीत दोन माजी सरपंचाचा पराभव झाल्याने आता गावगाड्याची सूत्र नवीन चेहऱ्याकडे लखमापुरवासीयांनी दिले आहे.  लखमापुर ग्रामपंचायती एकुण १३ सदस्य असुन ५ प्रभागरचना तयार करण्यात आली होती. त्यापैकी तीन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने १० जागांसाठी एकुण २१ उमेदवार निवडणुक रिंगणात आपले नशीब आजमावत होते. त्यात पुरुष मतदार संख्या १६०१ एवढी होती तर महिला मतदार संख्या १४६६ इतकी होती. तर एकुण मतदार ३०६७ एवढे होते. यंदाच्या निवडणूकीत माजी सरपंच ज्योती विजयराव देशमुख व माजी सरपंच मंगला रावसाहेब सोनवणे या दोन माजी सरपंचाचा पराभव झाल्याने ,तसेच माजी उपसरपंच बाळासाहेब शिवाजी देशमुख यांनी बाजी मारल्याने आता लखमापुर ग्रामपंचायतीवर नवीन चेहऱ्यांची वर्णी लागली आहे.--------------विजयी उमेदवार व प्रभाग पुढील प्रमाणे :-प्रभाग क्रमांक :- १ सोमनाथ बदादे :- ( विजयी ), सुमनताई रेहरे (बिनविरोध). प्रभाग क्रमांक:- २, भिकन राजदेव :- ( विजयी ), स्वाती दळवी ( बिनविरोध), प्रभाग क्रंमाक:-२ राजेंद्र देशमुख : (विजयी), प्रभाग क्रंमाक:-३ भाऊसाहेब मेसट : (विजयी), ज्योती मोगल : (विजयी), जया मोगल ( बिनविरोध) प्रभाग :-४ किशोर सोनवणे: (विजयी), प्रभाग :-४ पुष्पा सोनवणे:- (विजयी), प्रभाग :- ४ संगीता देशमुख:-( विजयी). प्रभाग क्रमांक :- ५बाळासाहेब शिवाजी देशमुख:- (विजयी), प्रभाग क्रमांक:-५ शालिनी सोनवणे:- (विजयी)-------------------दोन माजी सरपंच ज्योती देशमुख, मंगला सोनवणे व माजी सरपंच सुभद्रा देशमुख यांचे चिरंजीव मेघराज देशमुख यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत नवीन चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. आता सरपंच कोण? याकडे सर्व लखमापुर जनतेचे लक्ष लागले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक