शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चणकापूर-तळवाडेपर्यंत जलवाहिनीचा प्रस्ताव रद्द

By admin | Updated: November 11, 2015 22:40 IST

गिरणा : खोऱ्यातील सर्वपक्षीयांचा विरोध

मालेगाव : गिरणा खोऱ्यातील सर्वपक्षीय विरोधामुळे मालेगाव महानगरपालिकेने चणकापूर ते तळवाडे पाइपलाइनचा प्रस्ताव रद्द केल्याचे लेखी पत्राद्वारे आयुक्तांनी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. के. एन. अहिरे यांना कळविले आहे.चणकापूर धरणातून पाइपलाइनने पाणी आणावे यासाठी निर्मल योजनेंतर्गत १०० कोटी रुपये मालेगाव महापालिकेने मंजूर केले होते. या प्रस्तावाची माहिती गिरणा खोऱ्यातील मिळताच ब्राह्मणगाव येथे सर्वपक्षीय मेळावा घेऊन यास शेतकऱ्यांनी विरोध केला. तशी लेखी विचारणा संघर्ष समितीने सरपंच सुभाष अहिरे, शक्ती दळवी, संजय देवरे, अरुण अहिरे, संजय पवार, राजाराम शिरोळे आदिंंनी के. एन. अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटून सदर प्रस्तावास विरोध केला. याबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. यानुसार आयुक्तांनी लेखी पत्र देऊन हा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे कळविले आहे. पाइपलाइनचा विषय बंद झाला असला तरीही गिरणा खोऱ्यावर एक मोठे संकट येऊ घातलेले आहे. २००५ च्या समान पाणीवाटप कायद्याचा आधार घेऊन चणकापूर व पुनंदचे पाणी जळगाव जिल्ह्यासाठी गिरणा डॅममध्ये सोडावे असा कुटील डाव जळगावच्या नेत्यांनी टाकला आहे. धरणे कसमादेमध्ये आणि पाणी जळगाव जिल्हा वापरणार यास तीव्र विरोध आहे. आमदार, सहकार राज्यमंत्री यांना एका व्यासपीठावर आणून या प्रस्तावास विरोधासाठी रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय अहिरे यांनी जाहीर केला. (प्रतिनिधी)