Changes in city traffic route | शहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली
शहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली

नाशिक : विधानसभा निवडणकूीच्या मतमोजनीसाठी शहरात पाच ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहेत. या केंद्राजवळील परिसर नो व्हेईकल झोन असणे आवश्यक असल्याने वाहतूक शाखेने या पाचही केंद्राची वाहतूक बदलली असून चालकांना पर्यायी मार्गाची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी काढलेल्या अधिसुचनेनुसार गुरुवारी (दि.24) वाहतूक मार्गात बदल राहतील.
नवीन आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुल, भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडियम, नाशिकरोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि सीबीएस येथील शासकीय कन्या विद्यालय येथे मतमोजनी होणार आहे. मतदान झाल्यानंतर मतमोजनीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मतमोजनी केंद्रात नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.24) सकाळी सहा ते रात्री 12 पर्यंत मतमोजनी केंद्राजवळील मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

बंद केलेले मार्ग व पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे
* विभागीय क्रीडा संकुल : विभागीय क्रिडा संकुल समोरील सर्व्हिस रोड हिरावाडी टी पाँइट ते के. के. वाघ कॉलेज चौफुली पर्यंत तसेच हिरावाडी टी पाँइट ते पाटा पर्यंतच्या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील पर्यायी वाहतूक हिरावाडीकडून सर्व्हिसरोडने मुंबई आग्रा रोडवरून येणारी वाहतूक हिरावाडी काट्यामारुती चौक व स्वामी नारायण चौकाकडून इतरत्र जाईल.
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह : किनारा हॉटेल ते वडाळा रोड पुलापर्यंत तसेच भाभानगर कडून गायकवाड सभागृहाकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक नागजी सिग्नल भाभानगर मार्गे मुंबई नाक्याहून इतरत्र जाऊ शकेल. तसेच मुंबई नाक्याहून नागजी पुलाकडे येणारी वाहतूक भाभानगर मार्गे नागजी सिग्नलकडून वडाळा गाव व इतरत्र जाऊ शकेल. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक मार्गे साईनाथ चौफुली कडून इतरत्र जाऊ शकेल.
* छत्रपती संभाजी स्टेडीयम : सिडको रुग्णालय ते अंबड लिंकरोड, महाले पेट्रोल पंप ते मायको हॉल व आयडीयल कॉर्नर ते हॉटेल एक्सलेन्सी मार्गावरील वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आली आहे. या मार्गाऐवजी डीजीपी नगर, अंबड गाव- माऊली लॉन्स या मार्गाचा तसेच पाथर्डी फाटा, राणेनगर, लेखानगर या मार्गांवरून इतरत्र वाहतूक जाऊ शकेल.
* महापालिका विभागीय कार्यालय : मुक्तीधाम चौक ते सत्कार पॉइंट या मार्गावरील दुहेरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहन चालकांनी बिटको चौकाकडून सत्कार पाँइट जावे, तसेच नाशिकरोड रेल्वेस्टेशन, रिपोर्ट कॉर्नर ते सत्कार पाँइट कडून देवळाली कॅम्प, भगूरच्या दिशेने जाऊ शकतील.
* शासकीय कन्या विद्यालय : सिबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल दुतर्फा वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी वाहनचालकांनी सीबीएकडून अशोकस्तंभ रविवार कारंजा, पंचवटीकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नल मार्गे जाईल.


Web Title: Changes in city traffic route
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.