चांदवडला छायाचित्रकार दिन साजरा

By Admin | Updated: August 21, 2014 00:17 IST2014-08-20T22:22:40+5:302014-08-21T00:17:03+5:30

चांदवडला छायाचित्रकार दिन साजरा

Chandwadla photographer celebrates the day | चांदवडला छायाचित्रकार दिन साजरा

चांदवडला छायाचित्रकार दिन साजरा


चांदवड : येथे जागतिक छायाचित्रकार दिन कार्तिकेश्वर मंदिरात उत्साहात साजरा झाला. यावेळी सर्व छायाचित्रकारांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार अख्तरभाई शेख यांचा सत्कार भूषण कासलीवाल, मोहनलाल शर्मा यांनी केला, तर छायाचित्रकार पंडित गायकवाड यांची स्वकुळ साळी समाजाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी छाया चित्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेची स्थापना करण्याचा यावेळी निर्णय झाला. सूत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले. कार्यक्रमास पिंटू राऊत, रुपेश पवार, महेश गुजराथी , गणेश गायकवाड, अमोल राऊत, राजु हिरे, समीर शेख, एकबाल शेख, ज्ञानेश्वर ठाकरे, वसीम शेख, सत्तार भाई शेख, भास्कर वानखेडे, संजय गायकवाड, पंडित गायकवाड छायाचित्रकार उपस्थित होते.

Web Title: Chandwadla photographer celebrates the day