शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकांसमोर गुन्हेगारीचे आव्हान

By admin | Updated: March 25, 2015 23:57 IST

अधिकारी बदलले, प्रश्न ‘जैसे थे’

इंदिरानगर : उपनगरबरोबरच इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे येथील प्रमुखांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नवे प्रमुख नेमले आहेत़ उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत या दोघांपुढेही परिसरातील वाढत्या घरफोड्या, चेनस्नॅचिंग यांसह परिसरात फोफावलेल्या गुन्हेगारीचे आव्हान असणार आहे़इंदिरानगर पोलीस ठाण्यातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात अपयश येत असल्याने पोलीस आयुक्तांना दहा महिन्यांत चौथ्यांदा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलण्याचा प्रयोग करावा लागला़ विशेष म्हणजे, यापूर्वीच्या तिघांनाही वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश मिळविता आला नसल्याने नागरिकांनी बदलीची मागणीही केली होती़ इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत नासर्डी ते विल्होळी जकात नाक्यापर्यंतचा परिसर येतो़पोलीस ठाणे हद्दीतील झोपडपट्ट्यांमधील काही सराईत गुन्हेगार तसेच अवैध धंद्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे़ या परिसरात लुटमारी, चेनस्नॅचिंग व घरफोडीच्या घटनांचा आलेख चढता आहे़ यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांना निवेदन दिले़ यावेळी युनिक ग्रुप राजीवनगर, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघ, शिव मल्हार सेवा संस्था, विठ्ठल रुक्मिणी हास्य क्लबच्या सदस्यांसह यशवंत वाजे, स्वाती बेलदार, सविता एरंडे, माणिक मेमाणे, सुधीर बिडवई आदि उपस्थित होते़ (वार्ताहर)