शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

नाशिकची सिनेमागृहे बनली छावणी : पोलीस बंदोबस्तात ‘पद्मावत’ हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 6:41 PM

राजपूत समाजाकडून पद्मावती चित्रपटाला विरोध केल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रश्न न्यायालयात पोहचला. सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला.

ठळक मुद्दे पोलीस ठाणेनिहाय चित्रपत्रगृहांभोवती बंदोबस्त मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी भदक्राली पोलिसांनी आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.

नाशिक :पद्मावत’चा 'फर्स्ट डे फर्स्ट शो' बघण्यासाठी नाशिककरांची पावले सिनेमागृहांच्या दिशेने वळाली खरी; मात्र भीतीच्या सावटाखालीच. सिनेमागृहांच्या प्रवेशद्वारावर येताच पोलिसांचा फौजफाटा बघून नेमके आपण चुकून पोलीस छावणीत आलो की काय, असा अनेकांचा समज झाला, त्यामुळे अनेकांनी ‘पद्मावत’ पोलीस बंदोबस्त भ्रमणध्वनीच्या कॅमे-यात टिपत सोशल मीडियावर पोस्ट केला. दिवसभर सर्व सिनेमागृहांमध्ये ‘पद्मावत’ बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.राजपूत समाजाकडून पद्मावती चित्रपटाला विरोध के ल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रश्न न्यायालयात पोहचला. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चित्रपट गुरुवारी (दि.२५) प्रदर्शित करण्यात आला. देशभर सदर सिनेमा प्रसारित झाला; मात्र सर्वत्र विरोधाची धार तीव्र होती. नाशिकमध्येही चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणाºया एका ‘राणा सेना’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सेनेकडून कॉलेजरोडवरील सिनेमागृह व्यवस्थापकांना चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जात होता. भदक्राली पोलिसांनी आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. संध्याकाळपर्यंत सर्व शो सुरळीतपणे चालल्याचे पोलिसांनी सांगितले. परिमंडळ १ व २ मध्ये प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय चित्रपत्रगृहांभोवती बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

सकाळी नऊ वाजता चित्रपटगृहांमध्ये ‘पद्मावत’चा पहिला शो प्रदर्शित झाला. नाशिकमधील सर्व मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चित्रपटाची आॅनलाइन आगाऊ नोंदणी करत प्रेक्षकांनी ‘पद्मावत’चा आनंद लुटल्याचे सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांनी बोलताना सांगितले. आगाऊ नोंदणीमुळे नोंदणी काऊंटरवर फारशी गर्दीदेखील यावेळी झाल्याचे दिसून आले नाही. नाशिकरोड, उपनगर, गंगापूर, अंबड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणा-या सिनेमागृहांभोवती संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

टॅग्स :Padmavatपद्मावतNashikनाशिकSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीDeepika Padukoneदीपिका पादुकोण