शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीतील रुसवे-फुगवे पराभवाला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:10 IST

नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असली तरी, उमेदवार बदलाचा म्हणा किंवा ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात दिसत आहे.

नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असली तरी, उमेदवार बदलाचा म्हणा किंवा ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. यापूर्वी भाजपला २००९ व २०१४ मध्ये नांदगाव विधासभा मतदारसंघातून लाखाच्या आसपास मतांची आघाडी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. भारती पवार यांना मिळालेली मतांची आघाडी भाजपच्या प्रतिष्ठेला शोभणारी नक्कीच नाही. याचवेळी विरोधी मतांची झालेली विभागणी सर्वच विरोधी पक्षांना अंतर्मुख करणारी आहे. प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी झालेल्या शरद पवार यांच्या सभेचा अपवाद वगळता इतर कोणत्याही पक्षाच्या उमेवारासाठी नांदगावी मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. राजकीय पटलावर नव्याने उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीचा फॅक्टर तालुक्यात आगामी राजकारणासाठी दिशादर्शक ठरणारा आहे. तालुक्यात माकपाच्या मतदारांची संख्या निश्चित आहे. त्यामुळे माकपाच्या उमेदवारीचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मनसेचा प्रभाव अगदी किरकोळ असून, बसपाने दिलेली उमेदवारी केवळ मतांची राष्ट्रीय टक्केवारी वाढावी या उद्देशाने दिसते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्टÑवादीने प्रचारास सुरुवात केली तरी कॉँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्रचारात सक्रिय झाले नव्हते. त्यांचा रुसवा-फुगवा घालविण्यातच आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा वेळ गेला. कॉँग्रेस कार्यकर्ते नंतर सक्रिय झालेही मात्र त्याचा परिणाम दिसून आला नाही. याउलट साडेचार वर्षं राज्यात भाजप-शिवसेना आमने-सामने असल्यामुळे निवडणुकीत युती होते की नाही अशी स्थिती होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पातळीवर युतीची घोषणा होऊन दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर मनोमीलन मेळावे घेतल्याने भाजपबरोबरच शिवसेनेचे कार्यकर्तेही कंबर कसून कामाला लागल्याने त्याचा फायदा झाला.या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणामलोकसभेच्या महाद्वारातून विधानसभेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी झपाटलेल्या भाजप व शिवसेनेमधील इच्छुकांच्या अस्तित्वाचा घटक म्हणजे ही लढाई होती. लोकसभेत भाजप उमेदवाराचा विजय ही शिवसेनेची अडचण मानली जात आहे. यापूर्वी सेनेचे दोन आमदार झाले असले तरी, मोदींच्या नेतृत्वाखाली असलेला भाजप तिकिटात बाजी मारेल आणि जागावाटपात सेनेचा हक्क डावलला जाईल अशी भीती त्यांना वाटते. परंपरेने ही जागा कॉँग्रेसची आहे. राष्ट्रवादीने ती हिसकावून घेतली याचे शल्य काँगे्रसच्या मनात आहे. जी भीती शिवसेना-भाजप युतीमध्ये आहे तीच भीती कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतही आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी