कत्तलीसाठी जाणारी जनावरे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:05 IST2019-03-10T00:04:31+5:302019-03-10T00:05:23+5:30
संगमनेर येथे पिकअप गाडीतून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा जनावरांची शिंदे टोल नाका येथे सुटका करण्यात आली असून, दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कत्तलीसाठी जाणारी जनावरे जप्त
नाशिकरोड : संगमनेर येथे पिकअप गाडीतून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सहा जनावरांची शिंदे टोल नाका येथे सुटका करण्यात आली असून, दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक येथून संगमनेरला पिकअप गाडी (एमएच १५, जेव्ही १२१६) मधून जनावरे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात होते. शिंदे टोल नाका येथे पिकअप गाडीतून गायी कोंबून घेऊन जात असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पिकअप गाडी अडवली. पिकअप गाडी चालक शोएब नवाज खान (२२) रा. द्वारका व त्याचा सहकारी गंगाधर गायकवाड (३०) रा. जळे, ता.पेठ यांची चौकशी केली.