झाडावर कार आदळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 01:05 IST2019-04-02T01:04:28+5:302019-04-02T01:05:33+5:30

: इंदिरानगर येथील साईनाथनगर चौफुलीजवळ झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. किशोर जगताप असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

A car struck a tree and killed one | झाडावर कार आदळून एक ठार

झाडावर कार आदळून एक ठार

नाशिक : इंदिरानगर येथील साईनाथनगर चौफुलीजवळ झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. किशोर जगताप असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साईनाथनगर चौफुलीजवळ सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास सदर अपघात घडला. मयत किशोर जगताप हे आपली इंडिगो कार एमएच०२/६५४१ ने आपल्या गावाहून वडाळी (शहादा) येथून पहाटे चार वाजेच्या सुमारास आपल्या घराकडे निघाले असताना त्यांची कार एका झाडाला आदळली. या भीषण अपघातात जगताप यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची आई, पत्नी व मुलगा हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A car struck a tree and killed one