बोकडदरे येथे कार उलटून एक ठार

By Admin | Updated: August 5, 2016 01:12 IST2016-08-05T01:11:03+5:302016-08-05T01:12:09+5:30

बोकडदरे येथे कार उलटून एक ठार

A car hit a car at Bakedara and killed one | बोकडदरे येथे कार उलटून एक ठार

बोकडदरे येथे कार उलटून एक ठार



निफाड : तालुक्यातील बोकडदरे येथे नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर गतिरोधकावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून झालेल्या अपघातात गाडीचा चालक ठार झाल्याची घटना गुरु वारी रात्री घडली. कोपरगाव येथील तिघे जण स्विफ्ट डिझायर क्र मांक एमएच १७ एझेड-८१५७ ने नाशिक-औरंगाबाद रस्त्याने येत येत असतांना बोकडदरे येथील थांब्याजवळ गतीरोधकावर आदळून या गाडीने पाच पलट्या खाल्याने स्विफ्टचे चालक चैतन्य वाणी कर्मवीर नगर, कोपरगाव हे जागीच ठार झाले.
तसेच मयूर सुरेश गायकवाड (२०) संजीवनी कारखाना ,कोपरगाव आणि सुमित एकनाथ खरात (२१) महादेवनगर, कोपरगाव कॉलेजचे विद्यार्थी जखमी झाले. या सर्वाना तातडीने निफाड येथील उपजिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. जखमीवर ताबडतोब उपचार करण्यात आले.
 

Web Title: A car hit a car at Bakedara and killed one