शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

भुरट्या व्यापाऱ्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 1:10 AM

पिंपळगाव बसवंत : द्राक्षाची पंढरी समजली जाणार्या निफाड तालुक्यातील द्राक्षांचा गोडवा वाढला असून द्राक्ष विक्र ी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.त्यामुळे या द्राक्ष हंगामामध्ये कमिशन एजंट गिरी करणार्या दलालांचा देखील मोठा सुळसुळाट झाला आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : स्थानिक कमिशन एजंटची शेतकऱ्यांना धास्ती

पिंपळगाव बसवंत : द्राक्षाची पंढरी समजली जाणार्या निफाड तालुक्यातील द्राक्षांचा गोडवा वाढला असून द्राक्ष विक्र ी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.त्यामुळे या द्राक्ष हंगामामध्ये कमिशन एजंट गिरी करणार्या दलालांचा देखील मोठा सुळसुळाट झाला आहे.दलाल पद्धतीने हे भुरटे व्यापारी द्राक्ष खरेदी करतांना प्रथम रोखीने व्यवहार करतात आणि शेतकºयांचा विश्वास संपादन झाल्यावर त्यानंतर कोट्यवधीची द्राक्षे खरेदी करून पैसे बुडवतात असे प्रकार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी घटणार का.? असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकºयांना सतावत आहे. आणि या व्यापाºयांना या वर्षी कोण-कोणते शेतकरी बळी पडणार अशी देखील चर्चा शेतकºयांमध्ये सुरू आहे. त्यामुळे भुरट्या व्यापाºयंना व त्यांच्या दलालांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहेत.निफाड तालुका हा द्राक्ष पंढरी ओळखला जातो. शेतकरी काबाडकष्ट करून पोटच्या मुलाप्रमाणे द्राक्ष बाग फुलवतो. सध्या द्राक्षाचा सिझन जोरदार चालू झाला असून येथील द्राक्षांची खरेदी स्थानिक दलालांकडून केली जात आहे. पण हेच स्थानिक दलाल शेतकर्यांना बुडवण्याच्या घटना गेल्या कित्येक वर्षांपासून घटत आहे. गेल्या आठवड्यातच काही दलालांनी परिसरातील ७० शेतकºयांना कोटींचा गंडा घातल्याची घटना देखील पोलीस ठाण्यात दाखल आहे. हीफसवणूक थांबवण्यासाठी नाशिक पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी ठोस पावले उचलले आहेत. गावोगावी त्यांनी या व्यापारी व एजंटगिरी करणाºया दलालापासून कशी सतर्कता ठेवावी या बाबत शेतकºयांमध्ये जनजागृती देखील केली आहे.परतीच्या पावसात व गारपीटने निफाड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना हताश केले आहे. काही शेतकर्यांच्या बागांच्या बागा नष्ट झाल्या आहे. तर काही शेतकर्यांनी निसर्गाशी दोन हात करत अनेक संकटांवर मात करीत द्राक्ष बागा सांभाळल्या आहेत.या बागातील माल आता बाजारात विकण्यासाठी तयार झाला आहे. हा माल खरेदी करण्यासाठी दलालांचा मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. पण निसर्गापासून वाचवून ठेवलेल्या बागा शेतकर्यांना फायदेशीर ठरतील का की, व्यापारी व कमिशन दलालांच्या घशात जातील यांची चुरचूर शेतकर्यांना लागली आहे.पोलिसांनी केलेल्या जनजागृतीचा शेतकºयांवर परिणाम होतो की नाही की, कमिशन साठी दलालांने आणलेल्या व्यापाºया सोबत बांधावर व्यवहार करायचा हे त्या शेतकर्यानेच ठरवणे गरजेचे आहे.शेतकºयांनी काय करावे....कोणत्याही दलालाला व व्यापार्याला उधारीवर माल देऊ नये, सर्व व्यवहार रोखीनेच करा. गावातील शेतकºयांची एकी झाली तर कोणी फसविण्याचे धाडस करणार नाही. कारण शेतकरी कधी आपल्याशी परिचय नसलेल्या व्यापार्यास द्राक्ष उधार देण्याचे धाडस करीत नाही. आपल्या भागातीलच काही एजंट कमिशनसाठी माल उधारीवर द्या, मी आहे जबाबदार असे ठामपणे सांगतात व माल देण्यास भाग पाडतात. त्यांच्या पासून सावध राहा.जे व्यापारी पोलीस व बाजार समतिीकडे आपल्या नावाची नोंद करीत नाहीत, त्यांना आपला माल देऊ नका. दलाल आपल्या बागेत आल्यावर त्यांच्याकडे ओळखपत्र मागा किंवा त्यांनी आपली प्रशासनाकडे नोंद केली आहे की नाही, याची खात्री करा.पोलीस पाटीलच कमिशनच्या जाळ्यात अडकले तर...पोलीस प्रशासनाकडू प्रत्येक ग्रामपंचायत च्या ग्रामसभे शेतकर्यांना आव्हान करण्यात आले आहे, की तेथील पोलीस पाटलांकडे व्यापारी व व्यापाºयाला आणणºया एजंटची संपूर्ण माहिती त्या पोलीस पाटलांकडे देने बंधनकारक आहे पण जर पोलीस पाटलालाच कमिशन देऊन खोटी माहिती लिहण्यास एजंट व तो व्यापारी सांगू शकतो. त्यामुळे ही देखील दक्षता असणे गरजेचे असल्याचे मत द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहे.प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत शेतकºयांना आव्हान करण्यात आलेले आहे की,गावात व्यापारी द्राक्ष माल खरेदीसाठी येतो तेव्हा तेथील पोलीस पाटलांकडे त्या व्यापाºयांची नोंद असणे गरजेचे आहे. जसे त्याचे नाव, गाव, आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, मूळ गावच्या तहसील तेथील पोलीस ठाण्याची नोंद तसेच तो व्यापारी कोनामार्फत येतो. त्या स्थानिक एजंटची व्यापाºयापप्रमाणेच सर्व माहिती कारण व्यापारी पळून जाण्यामागे एजंटच कारणीभूत आसतात. त्यामुळे शेतकर्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्कता ठेवावी.- अरु ंधती राणे, विभागीय उपअधीक्षक, नाशिक ग्रामीण.स्थानिक भुरट्या एजंटगिरी करणºया दलालांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाही करणे गरजेचे आहे. जेणेकरून नव्याने तयार होणार्या दलालांना चाप बसेल.- केशव बनकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी