शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कॉ. माधवराव गायकवाड यांचे निधन : आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:36 IST

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

मनमाड : विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड उपाख्य बाबूजी यांचे वयाच्या ९५व्या वर्षी मनमाड येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. श्रमिक, मजूर व कष्टकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आयुष्य वेचणारा ‘आपला माणूस’ गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई व मुलगी अ‍ॅड. साधना गायकवाड असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी मंगळवारी (दि. १३) होणार आहे.  नगर जिल्हातील खंडकरी शेतकºयांच्या लढ्यामुळे सामान्य कष्टकरी शेतकºयांचे नेते म्हणून बाबूजींना ओळखले जात. १९५७ ते १९६२च्या कालावधीत विधान परिषदेची निवडणूक संयुक्त महाराष्ट्राच्या झेंड्यासाठी त्यांनी लढवली होती. त्या वेळेस दादासाहेब गायकवाड, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, साने गुरुजी, ना. ग. गोरे असे अनेक दिग्गज त्यांच्या बरोबर होते. त्याच बरोबर डॉ. ए.बी. वर्धन, सुधाकर रेड्डी, डी.राजा यांच्या सारखे अनेक कम्युनिष्ट नेते त्यांना सहकारी म्हणून लाभले. नांदगाव तालुक्यातून अनेक निवडणुका लढविल्या; परंतु प्रवाहाच्या विरुद्ध राजकारणात असल्याने त्यांना अनेक निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारावा लागला. १९७४ ते १९८१ पर्यंत मनमाड शहराचे थेट नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता. १९८४ मध्ये गायकवाड यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. प्रतिस्पर्धी उमेदवार बाळासाहेब विखे पाटील असल्याने ती निवडणूक राज्यात प्रतिष्ठेची ठरली होती. त्यावेळी बीबीसी रेडीओने त्यांच्या उमेदवारीची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द केले होेते. या वृत्तामुळे कॉँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी शेवटच्या दोन दिवसात प्रतिष्ठा पणाला लावली होती. या निवडणुकीत माधवराव गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. १९८५ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव मनमाडसह परिसरातील ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हारी लागला होता. सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून विजयाची माळ गायकवाड यांच्या गळ्यात घातली होती. आपल्या आक्रमक शैलीने त्यांनी विधानसभेत आवाज उठवून तालुक्यासाठी अनेक योजना मंजूर करून आणल्या होत्या.अल्प परिचय...कॉ माधवराव गायकवाड यांचा जन्म १८ जुलै १९२४ रोजी मनमाड येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला.बालपणापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांचे शिक्षण येथील छत्रे विद्यालयात झाले. परिसरात त्यांना बाबूजी म्हणून ओळखले जात.राज्यातील खंडकरी शेतकर्यांचे ते नेते होते . शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारून शेतकºयांना न्याय मिळवून दिला.१९६० ते १९६२ पर्यंते ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर १९७४ साली राज्यात प्रथमच जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीसाठी निवडणूक झाली.त्यात कॉ. गायकवाड यांना मनमाड नगर परिषदेवर जनतेतून थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. १९७४ ते १९८१ पर्यंत ते नगराध्यक्ष होते.१ सप्टेंबर १९७८ रोजी त्यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव म्हणून निवड झाली. १९८५ साली नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते आमदार झाले. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव तालुका हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता.जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.

 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू