कार अपघातात व्यवसायिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 19:11 IST2018-08-30T19:10:57+5:302018-08-30T19:11:06+5:30
लासलगाव येथील विद्यानगरमधील सुतार व्यवसायिक सुनील रवींद्र क्षीरसागर यांचा बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लासलगाव - पिंपळगाव बसवंत रस्त्यावर खानगाव फाटा येथे कार अपघातात मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

कार अपघातात व्यवसायिकाचा मृत्यू
लासलगाव : येथील विद्यानगरमधील सुतार व्यवसायिक सुनील रवींद्र क्षीरसागर यांचा बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लासलगाव - पिंपळगाव बसवंत रस्त्यावर खानगाव फाटा येथे कार अपघातातमृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. क्षीरसागर हे काम आटोपून त्यांच्या मुलासह नॅनो कारने रात्री लासलगाव येथे नॅनो कार क्रमांक एम. एच. १५ सी. एम. ५२१६ ही पिपंळगाव बंसवंतकडून लासलगाव बाजूकडे येत असताना घरी येत असतांना सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खानगाव शिवार येथे समोरून बाजूकडे जाणारी गाडी नंबर एम एच १५ बी डि ४८७३ हिचा व नॅनो कार अपघात होऊन क्षीरसागर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक एस.के.पांढरे यांंच्यासह स. पो. उपनिरीक्षक आर के अिहरे व पो कॉ कोते अधिक तपास करत आहे.