शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा

By admin | Updated: January 3, 2017 00:49 IST

मान्यवरांचे मत : विद्यार्थ्यांनी शिकून स्वावलंबी व्हावे

येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे आयोजित व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश खळे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. चिचोंडी बु।। ग्रामपंचायत सदस्य रवि गुंजाळ, सविता धिवर व अनिता राजगुरू यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
येवला जिल्हा नाशिक राजकीय व्यक्ती-पक्ष संघटना तरु णांना सुयोग्य दिशा न देता त्यांच्या ऊर्जा-शक्ती-बुद्धीचा वापर केवळ आपल्या हिताकरिता करत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जीवन संदेश तरुणांनी ध्यानात घेऊन त्याचे आचरण करावे. स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारून स्वावलंबी जीवन जगावे, असे मत अशोक धुरंधर यांनी बोलताना व्यक्त केले.
प्रमुख अतिथी म्हणून संजय पगारे, शरद शेजवळ, प्रा. जितेश पगारे, महेंद्र पगारे, भगवान चित्ते, सुरेश सोनवणे, पद्मा सोनवणे, भगवान साबळे, हिरामण मेश्राम उपस्थित होते.  भारतीय नागरिकांना धार्मिक, राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु आर्थिक लोकशाहीपासून जनता अजूनही दूर आहे. आर्थिक लोकशाही शिवाय राष्ट्र प्रगती करू शकणार नाही हा डॉ. आंबेडकर यांचा उपदेश- संदेश नीट समजून घेणे आवश्यक आहे.  तरुणांनी त्या दृष्टीने कार्यरत होण्यासाठी स्वावलंबी बना..! व्यवसाय करा..! उद्योजक व्हा व चळवळ उभी करा, असे आवाहन शेजवळ यांनी केले.  व्यवसाय मार्गदर्शन व उद्बोधन कार्यशाळेत प्रवेश सर्वांसाठी खुला व मोफत होता असे आयोजक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविकातून सांगितले. व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करून शिक्षण संस्थेने आदर्श निर्माण केला आहे, असे मत कार्यशाळेचे अध्यक्ष सुरेश खळे यांनी व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मयूर सोनवणे, सुनील वाघ, सुधाकर कुमावत, राहुल सोनवणे, विनोद वाघ, उमेश पगारे, प्रताप निकम, माधुरी कोकाटे, महेश गायकवाड, सागर मोरे, निखिल जाधव, शंकर बिदगर, विकास शेजवळ, रेणू कांबळे, सरला संसारे, योगिता परदेशी, ज्योती ढोकले यांच्यासह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्विनी ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. कविता काळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)