शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

पंचवटीत ‘शाहीमुद्रा सोशल ग्रुप’च्या नावाखाली जुगाराचा धंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 5:24 PM

नाशिक : पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी (दि़८)मध्यरात्री छापा टाकला़ पोलिसांनी जुगार अड्डयाचा संचालक व तथाकथित पत्रकार राहुल बागमार उर्फ जैन याच्यासह २१ जुगाºयांना अटक केली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने व मद्यसाठा यासह २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

ठळक मुद्देपचवटी पोलिसांचा छापा : संचालक राहुल बागमारसह २१ जुगारी ताब्यात रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पंचवटीतील इंद्रकुंडावर असलेल्या सिद्धी टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी (दि़८)मध्यरात्री छापा टाकला़ पोलिसांनी जुगार अड्डयाचा संचालक व तथाकथित पत्रकार राहुल बागमार उर्फ जैन याच्यासह २१ जुगाºयांना अटक केली असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने व मद्यसाठा यासह २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

पंचवटी पोलिसांनी रात्री बारा वाजेच्या सुमारास इंद्रकुंडावरील सिद्धी टॉवरमधील बी-१ मधील दुसºया मजल्यावरील हॉलमध्ये छापा टाकला असता संशयित अमोल चिचे (, रा. क्रांतीनगर), लक्ष्मण बेंडकुळे ( रा. पेठ रोड), नीलेश शहा (रा. वाघाडी), सचिन बिरादर (रा. पंचवटी), रमेश केदारे (रा. रेल्वे कॉलनी), सोमनाथ खंडारे (रा. वाघाडी), मनोज पंडित (रा. क्रांतीनगर), वासू मोहन नाईक (रा. खडकाळी), मनोज खिंवसरा (रा. रविवार पेठ), विनय गोगालिया ( रा. महालक्ष्मी चाळ), आरिफ शेख (रा. नाशिकरोड), प्रीतम पवार (रा.गजानन चौक), नीलेश ठाकरे (रा. वाघाडी), कृष्णा वानखेडे (रा. वाघाडी), कैलास वाघ (रा़वाल्मिकनगर), हसीन खाटीक (रा़ संजयनगर), शौकत खान (रा. खडकाळी), भरत अहिरे (राक़्रांतीनगर), रफिक पठाण (रा. द्वारका), अदिल शेख (रा़भद्रकाली) हे जुगार खेळत होते़ या जुगाºयांना ताब्यात घेतले असता संचालक बागमार हा घटनास्थळी आला व पोलिसांशी वाद घातला़ यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेऊन रोख रक्कमव मोबाईल जप्त केला़

सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, के. डी. वाघ, रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे, पोलीस हवालदार पाटील, बस्ते, ठाकरे, पोलीस नाईक नरवडे, पवार, पोलीस कॉन्स्टेबल साळुंके, चारोस्कर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रहाणे, कोकणी व गांगुर्डे यांनी ही कारवाई केली़बागमारची परिसरातून धिंड

पंचवटी पोलिसांनी जुगार अड्डाचालक तसेव कथित पत्रकार संशयित राहुल बागमार यांची मंगळवारी सकाळी पंचवटी परिसरातून धिंड काढली़ इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये ओली पार्टी करताना ग्रामीण पोलिसांनी बागमारला अटक केली होती़ त्यावेळीही त्याने पोलिसांना दमबाजी केली होती़ दरम्यान, त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़प्रत्येक डावामागे ७० रुपये कमिशन (नाल)

सिद्धीटॉवरच्या दुसºया मजल्यावर संचालक बागमार हा शाहीमुद्रा सोशल ग्रुपच्या नावाखाली जुगार अड्डा चालवित होता़ या ठिकाणी ३ पत्ते, १३ पत्ते व २१ पत्ते असा हारजितच्या पत्त्यावर जुगार चालत असे़ या जुगारीत डाव जिंकल्यास प्रत्येक जिंकलेल्या डावामागे ७० रुपये कमिशन (नाल) स्वरुपात बागमारला द्यावे लागत असे़जुगारीसाठी प्लास्टीक क्वाईनचा वापर

जुगारींची तोबा गर्दी असलेल्या या अड्डयावर रोख रकमेचा वापर न करता ठराविक मूल्यांचे प्लास्टीकचे लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या केशरी रंगाचे क्वाईन्स दिले जात असते़ या क्वाईनवर ५०, १००, २००, ५०० पॉइंटच्या स्वरुपात रोखीचे मूल्य बागमार यास देऊन खेळात जिकलेल्या पॉर्इंटच्या मोबदल्यात रोख मूल्य जुगार खेळणाºयांरा देऊन जुगार खेळला जात असे़२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त

सिद्धीटॉवरमध्ये जुगार अड्डयावर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ यामध्ये १ लाख ३५ हजार रुपयांच्या चार दुचाकी (पल्सर - एमएच १५, बीजी २९५१, अ‍ॅक्टिवा - एमएच १५, ईएन ३५९२, टिव्हीएस - एमएच १५, डीव्ही ३८५४, इटर्नो - एमएच १५, बीई - ६९७६), १५ हजार ७०० रुपयांचे जुगाराचे साहित्य, जुगाराचे चित्रिकरण करणारे सीसीटीव्ही कॅमेराचे चिरायु पतसंस्थेमध्ये ठेवलेले ३० हजार रुपयांचे तीन डिव्हीआर, ३९ हजार ७०० रुपयांची रोकड, ६६ हजार ६०० रुपयांचे मोबाईल, विदेशी मद्य तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसraidधाड