शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जानोरी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांसाठी बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 16:50 IST

शुभवर्तमान : जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी सुविधा उपलब्ध

ठळक मुद्देखाजगी शाळेकडे कल वाढत चालल्याने जिल्हा परिषद शाळा ओस पडत चालल्या आहेत.

दिंडोरी : ग्रामीण भागात पक्के रस्ते आणि बससेवेअभावी आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी मैलोनमैल पायपीट करत शाळेत जाताना दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण अधिक वाढते. जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा आणि विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबावी यासाठी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने सक्रीय सहभाग घेत वस्तीपासून शाळेपर्यंत बससेवा सुरू करत एक वेगळा आदर्श घडविला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बससेवा सुरू झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनी पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला आहे. खाजगी शाळेकडे कल वाढत चालल्याने जिल्हा परिषद शाळा ओस पडत चालल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचीही शाळा खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकाव आणि या शाळेकडेही पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांची गरज ओळखून वस्तीपासून शाळेपर्यंत बस सेवा सुरू करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला . त्यानुसार शिवाजीनगर पासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार व गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना गट विकास अधिकारी भावसार यांनी जानोरी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे स्वागत केले. यातून नक्कीच मुलांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण होईल. ही सेवा निरंतर सुरू राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा