म्हसरूळ शिवारात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST2019-03-15T23:42:14+5:302019-03-16T00:33:18+5:30
म्हसरूळ शिवारातील ओंकारनगर येथे असलेल्या बंद सदनिकेचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे.

म्हसरूळ शिवारात घरफोडी
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील ओंकारनगर येथे असलेल्या बंद सदनिकेचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. प्रकरणी काशीनाथ सुका साळवे या वृद्धाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ परिसरातील ओंकारनगर येथे रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये काशीनाथ साळवे राहत असून, गेल्या ४ ते १२ मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद सदनिकेचे कडीकोयंडा तोडून घरफोडी केली.
चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या तसेच मनगटी घड्याळ असा सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. साळवे घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावरून घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराची म्हसरूळ पोलिसांना माहिती दिली त्यावरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.