शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

दारुण पराभवावर बसपाचा उतारा ...म्हणे संघटन करण्यात यशस्वी

By admin | Updated: May 17, 2014 00:40 IST

नाशिक : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहन मायावती यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. सभेनंतर उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये संचारलेल्या उत्साहामुळे बसपा उमेदवाराच्या कामगिरीकडे मतदारांपेक्षा पक्षाचेच अधिक लक्ष होते. परंतु अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करता आल्याने सपशेल पराभव स्वीकारावा लागला असला, तरी संघटन करण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्टीकरण बसपा पदाधिकार्‍यांनी दिले. एवढेच काय, विधानसभा निवडणुकीत कामगिरी सुधारण्याकडे भर देणार असल्याचेही स्पष्ट केले.

नाशिक : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहन मायावती यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. सभेनंतर उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये संचारलेल्या उत्साहामुळे बसपा उमेदवाराच्या कामगिरीकडे मतदारांपेक्षा पक्षाचेच अधिक लक्ष होते. परंतु अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करता आल्याने सपशेल पराभव स्वीकारावा लागला असला, तरी संघटन करण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्टीकरण बसपा पदाधिकार्‍यांनी दिले. एवढेच काय, विधानसभा निवडणुकीत कामगिरी सुधारण्याकडे भर देणार असल्याचेही स्पष्ट केले. पराभूत झालेले उमेदवार पराभवाची कारणमीमांसा करण्यात व्यस्त असताना, बसपा मात्र मिळालेल्या जेमतेम मतांवरच खूश असल्याचे समजते. ऐनवेळी बंडखोर उमेदवाराला जाळ्यात ओढण्याचा फार्म्युला यावेळेसदेखील बसपाने कायम ठेवला. कॉँग्रेसचे बंडखोर नगरसेवक दिनकर पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. केवळ भुजबळविरोध समोर ठेवून रिंगणात उतरलेल्या पाटील यांनी विजयाबाबत निश्चिंत असल्याचे वारंवार स्पष्ट केले. परंतु मतदारांचा कौल समोर आल्यानंतर बसपा पदाधिकार्‍यांनी यावर सावरासावर करीत मतांचा टक्का वाढल्याचे उत्तर दिले. स्थानिक पदाधिकार्‍यांच्या प्रतिक्रियांमधून पक्ष जरी यशस्वी झाला असला, तरी पाटील यांचा दारुण पराभव झाला हे निश्चित.आता बसपाला म्हणजेच पाटील यांना विधानसभेचे वेध लागले असून, त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू असल्याचे समजते. जिल्‘ातील सर्व विधानसभा मतदारसंघांत बसपाचे उमेदवार उभे करून सर्व उमेदवारांच्या प्रचाराची धुरा आपणच सांभाळणार असल्याचे पाटील यांनी याअगोदरच स्पष्ट केले आहे. सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवारमतांची टक्केवारी वाढवण्यावर सर्वाधिक भर देणार्‍या बसपाला आत्तापर्यंत राज्यातून एकही खासदार लोकसभेत पाठविता आला नाही. या निवडणुकीतदेखील त्यांनी मतांची टक्केवारी वाढविण्यावरच भर दिल्याचे समजते. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून बसपाला सर्वाधिक मते दिनकर पाटील यांच्या माध्यमातून मिळाली आहेत.