शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने वीजबिलांचा भरणा केलेला नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे मोबाइल ...

ठळक मुद्देसुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने वीजबिलांचा भरणा केलेला नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे मोबाइल टॉवर व दूरध्वनी नियंत्रण केंद्रे (टेलिफोन एक्स्चेंज) बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर वीजबिलांचा भरणा : जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने यंत्रणा होणार पूर्ववतनिवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरूविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेतील समन्वय आणि संपर्कात अडसर निर्माण होत असल्याने ही सर्व केंद्रे पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यातील सुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.ग्रामीण भागात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापासून ते थेट मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बीएसएनएलची मोबाइल अथवा दूरध्वनी सेवा अतिशय महत्त्वाची ठरते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करतानाही बीएसएनएलला उशीर होत आहे. त्यातच जिल्हाभरातील सुमारे ८० ते ८५ मोबाइल टॉवरचे आणि १२५ ते १५० एक्सेंड अनियमित बिल भरण्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद होते.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत यंत्रणेशी समन्वय साधताना अडसर निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून महावितरण आणि बीएसएनएल या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने मोबाइल टॉवर व एक्स्चेंज सेंटरचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात बीएसएनएलकडून काही प्रमुख केंद्रांचा व टॉवरचा वीजबिल भरणा केला जात असून प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले असून, उर्वरित केंद्रेही लवकरच सुरू होणार आहेत. खंडित वीजपुरवठा पुन्हा जोडण्यास प्रारंभबीएसएनएलच्या थकीत वीजबिलांमुळे एमएसईबीतर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे मोबाइल टॉवर व टेलिफोन एक्स्चेंजचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; मात्र याचा थेट निवडणूक यंत्रणेवर परिणाम झाल्याने अखेर राज्य शासनाने निवडणूक काळात एमएसईबीला बीएसएनएल आणि एमटीएनएलचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलInternetइंटरनेट