पॉलिशच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 18:32 IST2018-09-02T18:31:45+5:302018-09-02T18:32:28+5:30

नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेकडील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोघा संशयितांनी लंपास केल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास अशोकस्तंभ परिसरात घडली़

Brush jewelry with a polishing shirt | पॉलिशच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास

पॉलिशच्या बहाण्याने वृद्धेचे दागिने लंपास

ठळक मुद्देदोघा संशयितांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेकडील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोघा संशयितांनी लंपास केल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास अशोकस्तंभ परिसरात घडली़

शहरातील घारपुरे घाट परिसरात शशिकला सुधाकर तांबट (६९) या वृद्धा राहतात़ शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील दोन तरुण तांबट यांच्या घरी आले़ त्यांनी तुमच्या घरातील भांडे तसेच सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश देतो असे सांगितले़ या दोघांवर विश्वास बसल्याने त्यांनी आपल्या गळ्यातील चार तोळे वजनाची ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र पॉलिश करण्यासाठी दिले़

यानंतर या दोघा संशयितांनी मंगळसूत्रास पॉलिश करतो आहोत असे भासवून शशिकला यांना बोलण्यात गुंतविले व मंगळसूत्र हातोहात लंपास केले़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात या दोघा संशयितांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Brush jewelry with a polishing shirt